शिंदे गटाचा महाविकास आघाडी ठाकरे गटाला मोठा धक्का

0

नाशिक,दि.6: शिंदे गटाने (Shinde Group) महाविकास आघाडी ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यामुळे राज्यात सत्तांतर झाले. तेव्हापासून आजतागायत शिंदे गटाने ठाकरे गटाला (शिवसेना) अनेक धक्के दिले आहेत. काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये ठाकरे गटाचे नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले होते. त्यानंतर आता पुन्हा शिंदे गट उद्धव ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत आहे. (Shinde Group News)

संजय राऊत नाशिक दौऱ्यावर

नाशिकमधील ठाकरे गटाची होणारी पडझड रोखण्यासाठी संजय राऊत 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यातच आता नाशिकचे ठाकरे गटाचे 50 पदाधिकारी हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा धक्का बसण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीतील 30 नगरसेवक शिंदे गटात जाणार | Shinde Group News

परभणीत महाविकास आघाडीतील 30 नगरसेवक शिंदे गटात जाणार आहे. ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे. संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असतानाच ठाकरे गटाला शिंदे गटाने मोठा धक्का दिला आहे.

राऊत आज दोन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर आहेत.या आधीही राऊतांची पाठ फिरताच 12 माजी नगरसेविकांनी शिंदें गटात प्रवेश केला होता. डॅमेज कंट्रोलसाठी उध्दव ठाकरे यांची जानेवारी अखेर सभा होणार मात्र त्या आधीच पक्षाला पुन्हा गळती लागली आहे.

महाविकास आघाडीतील 30 नगरसेवक शिंदे गटात

तर परभणी जिल्ह्यातील पाथरी, पूर्णा, पालम येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तसेच राष्ट्रीय समाज पक्ष, एमआयएम, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 30 नगरसेवकांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.  

शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार मार्गक्रमण करताना सध्या अनेक लोक येऊन पक्षाला जोडली जात आहेत. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या पक्षातील नगरसेवक आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करत आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. राज्यातील सरकार सत्तेत आल्यापासून कष्टकरी, शेतकरी कामगार आशा सर्वच घटकातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून नक्की प्रयत्न करू असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here