Sharad Pawar On Congress: काँग्रेस मुक्त भारतवर शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

Congress: पक्षाची विचारधारा आणि योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही

0

पुणे,दि.29: Sharad Pawar On Congress: काँग्रेस मुक्त भारतवर (Congress Mukt Bharat) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पवार पुण्यातील काँग्रेस कार्यालयात पक्षाच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (MVA) आघाडीच्या नेत्यांचा उल्लेख करत भाजप सरकारवर निशाणा साधला. शरद पवार यांनी शिवसेना नेते संजय राऊत राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे नाव घेत ईडीचा दुरुपयोग सरकार करत असल्याचा आरोपही केला.

काँग्रेस मुक्त भारत शक्य नाही: शरद पवार | Sharad Pawar On Congress

“काँग्रेस मुक्त भारत शक्य नाही कारण पक्षाची विचारधारा आणि योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. हे ठिकाण अनेक ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार आहे. काँग्रेसचे जवळपास सर्व दिग्गज महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी या ठिकाणी भेट दिली आहे. यापूर्वी पुणे काँग्रेसचे कार्यालय येथे होते. स्वतः राज्याचे मुख्य कार्यालय हेच होते, असंही शरद पवार म्हणाले. 

Sharad Pawar On Congress
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

भारताला पुढे न्यायचे असेल तर… | Sharad Pawar On Congress Mukt Bharat

‘काँग्रेसचे योगदान आणि इतिहास दुर्लक्षित करता येणार नाही. “काही लोक म्हणतात की, आम्ही भारत काँग्रेस मुक्त करू, पण भारत काँग्रेसमुक्त करणे शक्य नाही. खरे तर भारताला पुढे न्यायचे असेल तर काँग्रेसला पुढे घेऊन जावे लागेल काँग्रेसची विचारधारा कोणतीही असो, तुम्ही काँग्रेसला दुर्लक्ष करू शकत नाही, असंही पवार म्हणाले. 

जाहिरात

आम्हाला तुमचा पाठिंबा मिळेल…

महाराष्ट्रातील आणि राष्ट्रीय पातळीवरील सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. “मला खात्री आहे की काँग्रेस-मुक्त भारतच्या विचारसरणीचा सामना करण्यासाठी आणि पराभूत करण्यासाठी आम्हाला तुमचा पाठिंबा मिळेल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.

शरद पवार पूर्वी काँग्रेसमध्येच होते

शरद पवार यापूर्वी काँग्रेसचे कार्यकर्ते होते. पुणे जिल्ह्यातून त्यांनी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून राजकीय प्रवासाला सुरुवात केली.त्यांनी पुढ 1999 मध्ये काँग्रेसला राजीनामा दिला.

28 डिसेंबर रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा 138 वा स्थापना दिवस झाला. स्थापना दिनानिमित्त काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मुंबईतील सोमय्या मैदानावर सभेला हजेरी लावली. यावेळी कन्हैया कुमार, नाना पटोले, केसी वेणुगोपाल, अशोक चव्हाण आणि इम्रान प्रतापगढ़ी हे काँग्रेस नेते उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here