शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर घेतला महत्वाचा निर्णय

0

मुंबई,दि.12: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईत बैठक घेतली. बैठकीनंतर शरद पवार यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेत बंड पुकारून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक घेतली. यावेळी, ‘भाजपला दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी (mva government) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या एकत्र लढणार’ अशी घोषणा पवारांनी केली आहे. तसंच, आमदार फुटले असले तरी शिवसैनिक हे उद्धव ठाकरेंसोबतच आहे, असंही पवार म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईत बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व आमदार हजर होते. या बैठकीनंतर हेमंत तपासे यांनी माध्यमांना माहिती दिली.

पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. महाराष्ट्रामध्ये सत्ता गेली तरी फरक पडत नाही. निवडणुकांसाठी आमचे कार्यकर्ते तयार आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये विरोधी पक्ष म्हणून आम्ही आग्रही भूमिका घेणार आहोत, असं हेमत तपासे यांनी सांगितलं.

भाजपला दूर ठेवण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार आहोत. उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. आज आमदार जरी विभागले गेले असले तरी कार्यकर्ते तळागळातील शिवसैनिक ठाकरे सोबत आहेत, असंही पवारांनी सांगितलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here