Sharad Pawar On Raj Thackeray: भोंग्याबद्दल राज ठाकरेंच वक्तव्यावर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया

0

मुंबई,दि.१३:Sharad Pawar On Raj Thackeray: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) भोंग्याबद्दल राज ठाकरेंचं (Raj Thackeray) वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंनी ठाण्याच्या सभेत मशिदींवरील भोंगे ३ मे पर्यंत काढावेत अन्यथा आम्ही हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला होता. यावर शरद पवारांनी राज्य सरकार भोंग्याबद्दल राज्य सरकार गांभीर्याने विचार करेल असे म्हणाले.

शरद पवार हे स्वत : नास्तिक आहेत. ते धर्म, देव मानत नाहीत. या पद्धतीनेच ते राजकारण करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे मी जातीवाद भडकवतो आणि भूमिका बदलतो, यावर पवारांनी बोलावे का, असा सवाल राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत विचारला. पवारांनी आतापर्यंत असंख्य भूमिका बदलल्या, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले. दरम्यान मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी राज ठाकरेंच्या सर्व आरोपांना उत्तरं दिली. यावेळी त्यांनी मी माझ्या देवधर्माविषयीचं प्रदर्शन कुठे करत नाही असंही सांगितलं.

शरद पवार म्हणाले की , “त्यांनी माझ्याबद्दल सांगितलं की मी नास्तिक आहे. मी माझ्या देवधर्माविषयीचं प्रदर्शन कुठे करत नाही. मी १३-१४ वेळा निवडणुकीला उभा राहिलो. निवडणुकीचा नारळ कुठे फोडतो, हे बारामतीच्या लोकांना जाऊन विचारा. एकच मंदिर आहे. तिथे फोडतो. त्याचा आम्ही कुठे गाजावाजा करत नाही”.

“दुसरी गोष्ट आहे की माझ्यापुढे काही आदर्श आहेत. त्या आदर्शांमध्ये प्रबोधनकार ठाकरेंचा आदर्श आहे. त्यांचं लिखाण वाचलं, तर याबाबत सविस्तर मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. त्यांनी देवधर्माचा बाजार मांडणाऱ्या प्रवृत्तींवर प्रचंड टीका केली आहे. त्याचा गैरफायदा घेणारा कुणी घटक असेल, तर त्याला ठोकून काढण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्यांचं लिखाण आम्ही लोक वाचतो, पण सगळेच वाचत असतील, कुटुंबातले लोक वाचत असतील असं नसावं. त्यामुळे अशी विधानं केली गेली असावीत. यावर अधिक बोलण्याची आवश्यकता नाही,” असं सांगत शरद पवारांनी यावर जास्त भाष्य करण्यास नकार दिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here