Sharad Pawar: निवडणुकीत एकत्र यायचे आणि हळूहळू मित्रपक्षांना संपवायचे; शरद पवारांची भाजपावर टीका

0

मुंबई,दि.10: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका केली आहे. भाजपा मित्रपक्षांना संपवत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. नितीश कुमार (Nitish Kumar) यांनीही भाजपावर आरोप करत बिहारमधील भाजपा बरोबर असणारी युती तोडली व लालू प्रसाद यादव यांच्या राजद पक्षाशी युती केली. भाजपा बरोबर युती केल्यानंतर आपल्या विधान सभेच्या जागा कमी झाल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिली. महाराष्ट्रातही एकेकाळी शिवसेनेच्या जागा जास्त निवडून येत होत्या. मात्र नंतर भाजपाच्या जागा वाढल्या व शिवसेनेच्या जागा कमी झाल्या.

एकीकडे महाराष्ट्रात भाजपा (BJP) पुन्हा सत्तेत आलं असलं तरी बिहारमध्ये (Bihar) मात्र नितीश कुमारांनी (Nitish Kumar) राजदचा हात धरत पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नितीश कुमार आठव्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. तर तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपाचा धोका ओळखून नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.

भाजप मित्रपक्षांना संपवतोय – शरद पवार

निवडणुकीत एकत्र यायचे, मित्र पक्षातील लोकांच्या जागा कशा कमी येतील याची काळजी घ्यायची घ्यायची आणि हळूहळू मित्रपक्षांना संपवायचे, ही भाजपची रणनिती आहे. महाराष्ट्रात शिवसेनेत फूट कशी पडेल, अशी परिस्थिती निर्माण केली. अशीच खेळी बिहारमध्ये सुरू होण्याआधीच नितीश कुमार वेळीच सावध झाले. त्यांनी तातडीने राजीनामा दिला. आता भाजपचे नेते त्यांच्यावर टीका करत आहेत. परंतु नितीश कुमारांनी टाकलेले पाऊल शहाणपणाचे आहे, असे सांगत शरद पवार यांनी महागठबंधन करण्याच्या निर्णयाला समर्थन दिले आहे.

शरद पवार म्हणाले की, देशातील सर्व पक्ष संपतील, देशात फक्त भाजपच राहील. असे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J. P. Nadda) यांचे म्हणणे आहे. भाजप आपल्या मित्रपक्षांना हळूहळू संपवत असल्याची नितीशकुमार यांचीही तक्रार होती, हे त्यांच्या विधानावरून स्पष्ट होते. असेही पवार म्हणाले.

उदाहरण देताना शरद पवार म्हणाले की, अकाली दल सारखा पक्ष त्यांच्या (भाजप) सोबत आहे. त्याचे नेते प्रकाशसिंग बादल त्यांच्यासोबत होते, पण आज पंजाबमध्ये अकाली दल जवळपास संपला आहे, असे ते म्हणाले.

शिवसेना आणि भाजप महाराष्ट्रात अनेक वर्षे एकत्र होते. आज भाजप पक्षात तेढ निर्माण करून शिवसेनेला कमकुवत कसे करता येईल याचे नियोजन करत आहे, त्यात एकनाथ शिंदे व इतरांनी त्यांना मदत केली आहे.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसंच लवकरच विधानसभेचं अधिवेशन बोलावलं जाणार असल्याचं सांगितलं. शिवाय त्यांनी मंत्र्यांचेही शपथविधी लवकरच होतील. वेळ आल्यावर जनतेला सर्वकाही सांगू, भाजपसोबत गेल्यानंतर आपल्या जागा कमी झाल्या, अशी प्रतिक्रियाही दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here