शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट

0

मुंबई,दि.२१: वंचित बहुजन आघाडीला राज्याच्या स्तरावर महाविकासआघाडीत आणि देशाच्या पातळीवर ‘इंडिया’ आघाडीत सहभागी करून घेण्याच्या मुद्द्यावर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी यावरून अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्षावर गंभीर आरोप केले.

अशातच शनिवारी (२१ ऑक्टोबर) शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे भेट झाली. यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीबाबत विचारलं असता प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “शरद पवार यांच्याबरोबरच्या आजच्या भेटीत महाविकासआघाडी किंवा इंडियात सहभागी होण्याबाबत काहीच चर्चा झालेली नाही. देशातील आगामी ५ राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत काही घडले, असं मला वाटत नाही.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here