Deepak Kesarkar: अजित पवारांबाबत शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांचा खळबळजनक दावा

Deepak Kesarkar On Ajit Pawar: दीपक केसरकर यांनी अजित पवारांबाबत केला खळबळजनक दावा

0

सिंधुदुर्ग,दि.25: Deepak Kesarkar On Ajit Pawar: राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांबाबत (Ajit Pawar) शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर (Deepak kesarkar) यांनी खळबळजनक दावा केला आहे. दीपक केसरकर यांनी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घुसमट होत आहे, असा दावा केला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

काय म्हणाले दीपक केसरकर? | Deepak Kesarkar On Ajit Pawar

‘दादा आमच्या सगळ्यांसोबत आले तर आनंदच होईल. राष्ट्रवादीमध्ये त्यांची घुसमट होतेय हे सगळ्यांनी बघितलंच आहे. एखादा उमदा नेते येत असेल तर कुणाला आवडणार नाही?,’ असं केसरकर म्हणाले आहेत.

भाजपचे आमदारांनी पवारांबाबत केलं होतं विधान

भाजपचे आमदार प्रविण पोटे यांनी काल अजित पवारांबाबत एक विधान केलं होतं, त्यावर दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दादा तुमची वेळ थोडी चुकली, सकाळऐवजी दुपारी झालं असतं तर तुम्ही आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असता, असं प्रविण पोटे म्हणाले होते.

जाहिरात

अजित पवारांवर शरद पवार नाराज?

हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं निलंबन करण्यात आलं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत जयंत पाटील यांनी वादग्रस्त विधान केलं, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या मुद्द्यावरून शरद पवार अजित पवारांवर नाराज झाल्याची चर्चा सुरू झाली. शरद पवारांनी दिल्लीहून अजित पवारांना फोन केला आणि संपूर्ण प्रकरणाबाबतची माहिती घेतली. तसंच या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवारांनी आक्रमक भूमिका घ्यायला पाहिजे होती. अजित पवार यांनी सभागृहात माफी मागण्यापेक्षा कठोर भूमिका घ्यायला हवी होती. मात्र तसं न झाल्यानं शरद पवार हे अजित पवारांवर नाराज असल्याचं बोललं जातंय.

अजित पवारांनी मात्र शरद पवार नाराज असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. एवढच नाही तर त्यांनी या मुद्द्यावरून मीडियावरच संताप व्यक्त केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here