एका कुटुंबाचा नाही बाळासाहेबांच्या विचारांचा दसरा मेळावा, एकनाथ शिंदे गटाचा टिझर

0

मुंबई,दि.4: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून 5 ऑक्टोबरच्या दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. दसरा मेळाव्याचं पहिलं पोस्टर आणि टिझर आता समोर आलं होते. या पोस्टरला एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ असं कॅप्शन देण्यात आलं आहे. सोबतच या पोस्टरमध्ये बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो वापरण्यात आला आहे. तसंच सगळ्यात वरती डाव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि उजव्या बाजूला शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह लावण्यात आलं आहे.

5 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता वांद्र्याच्या बीकेसी मैदानामध्ये शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला सुरूवात होणार आहे. याचवेळी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कवर होईल. एकनाथ शिंदे गटाचा नवीन टिझर समोर आला आहे.

या टिझरमध्ये हिंदुत्वाचा रथ पुढे नेणारा मेळावा, विचारधारा विसरणाऱ्यांना धडा देणारा मेळावा, एका कुटुंबाचा नाही बाळासाहेबांच्या विचारांचा दसरा मेळावा असे दाखवण्यात आले आहे. टिझरमध्ये बाळासाहेब ठाकरे व एकनाथ शिंदे यांना दाखवण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here