महाराष्ट्रातील शाळा या तारखेपासून होणार सुरू

0

दि.24 : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील शाळा बंद आहेत. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचा ऑनलाईन क्लास घेतला जात आहे. शाळा, कॉलेज बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. शाळा सुरू करण्याची मागणी अनेक पालकांनीही केली होती.

महाराष्ट्रातील शाळा अखेर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार आता येत्या 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता प्रस्ताव. अखेर या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळाली आहे.

4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शाळा सुरू करण्यास मान्यता दिली आहे. शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव  पाठवला होता. या प्रस्तावावर विचार आणि चर्चा करून मान्यता देण्यात आली आहे. अखेर या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळाली आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here