दि.28: SBI Recruitment 2022: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. अनेकांना बँकेत नोकरी करण्याची इच्छा असते. बँकेत नोकरी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. बँकेत सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 27 एप्रिल 2022 पासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाइट http://sbi.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. SBI SCO भर्ती 2022 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 मे 2022 आहे. अधिसूचनेनुसार, SBI स्पेशल कॅडर ऑफिसरच्या एकूण 35 जागा आहेत. यामध्ये 29 पदांची कंत्राटी पद्धतीनं भरती होणार असून 7 पदांची नियमित भरती करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 55 पदांची भरती करण्यात आली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मे 2022
VP आणि Sr. स्पेशल एक्झिक्युटिव्हसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 मे 2022
व्यवस्थापक आणि सल्लागार पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 एप्रिल 2022
रिक्त जागा तपशील
सिस्टम ऑफिसर : 7 पदं
कार्यकारी : 17 पदं
वरिष्ठ कार्यकारी : 12 पदं
मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी : 1 पदं
उपाध्यक्ष आणि प्रमुख : 1 पदं
वरिष्ठ विशेष कार्यकारी : 11 पदं
व्यवस्थापक : 2 पदं
सल्लागार : 4 पदं
निवड प्रक्रिया
स्टेट बँक ऑफ इंडिया ज्या पदांसाठी भरती जारी केली आहे, त्या पदांसाठी उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल. ही गुणवत्ता यादी केवळ मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे तयार केली जाईल. सिस्टम ऑफिसर (चाचणी अभियंता आणि वेब डेव्हलपर) या पदांसाठी व्यावसायिक ज्ञान चाचणी (150 गुणांपैकी) आणि मुलाखत (25 गुणांपैकी) गुण एकत्र करून अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.