सौदी अरेबियाने Tablighi Jamaat वर घातली बंदी, ते दहशतवादाचे सर्वात मोठे प्रवेशद्वार असल्याचे म्हटले

0

Tablighi Jamaat : सौदी अरेबियाने (Saudi Arabia) सुन्नी मुस्लिमांची (Sunni Muslim) सर्वात मोठी संघटना तबलिगी जमातवर (Tablighi Jamaat) बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. दहशतवादाचा सर्वात मोठा दरवाजा असल्याचे सांगून तेथील सरकारने तबलीगी जमातवर (Tablighi Jamaat) पूर्णपणे बंदी घातली आहे.

स्पष्ट आदेश जारी करताना सरकारने म्हटले आहे की, यापुढे लोकांना शुक्रवारच्या नमाजच्या वेळी तबलीगी जमातला (Tablighi Jamaat) भेटण्याची गरज नाही, त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवणे बंधनकारक असणार नाही.

सरकारच्या मते ही संघटना समाजासाठी धोकादायक असून देशात दहशतवादाचे दरवाजे उघडण्याची क्षमता तिच्यात आहे. या कारणास्तव, सरकारने सर्व मशिदींना आवाहन केले आहे की त्यांच्या माध्यमातून लोकांना जागरुक करावे, तबलिगी जमात का आणि कशी समाजासाठी धोकादायक आहे हे सांगावे.

सौदी सरकारचा असा विश्वास आहे की, तबलिगी जमातची चुकीची कामे लोकांपर्यंत पोहोचवल्यास त्यांना त्याची माहिती सातत्याने दिली जाईल, अशा परिस्थितीत तबलीगीचे महत्त्व समाजात कमी होईल. आता सौदी अरेबियामध्ये मुस्लीम लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्याने हा निर्णय तबलिगी जमातसाठी मोठा धक्का ठरू शकतो.

ही तीच तबलिगी जमात (Tablighi Jamaat) आहे, ज्याच्या कारणावरून गेल्या वर्षी भारतात मोठा गोंधळ झाला होता. देशात कोरोनाच्या पहिल्या लाटेत (Corona First Wave) तबलिगी जमातने धोका वाढवला होता, असे म्हटले जात होते. तो सगळा गोंधळ भारतातच राहिला, पण आता सौदी अरेबियाने तबलिगीवर सर्वात मोठी कारवाई केली आहे. थेट बंदी लादून अनेक देशांना कडक संदेश दिला आहे.

तबलिगी जमात (Tablighi Jamaat) संघटनेबद्दल बोलायचे झाले तर इस्लामबद्दल धार्मिक प्रवचन देणे हे तिचे काम आहे. मात्र वेळोवेळी या संघटनेवर प्रक्षोभक विधाने केल्याचा आरोपही होत असून आता सौदी अरेबियाने त्याचे नाव दहशतवादाशी जोडले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here