मुंबई,दि.१२: Satish Kaushik-Death: प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या निधनानं बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. नेहमी इतरांना हसवणारे सतीश कौशिक यांची आयुष्याच्या पडद्यावरची अचानक झालेली एक्झीट अनेकांना रडवून गेली. फिल्म इंडस्ट्रीपासून कुटुंबही सतीश कौशिक यांच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरले नाही. सतीश कौशिक यांच्या अखेरच्या काळात त्यांचा मॅनेजर संतोष रायसोबत होता. आता संतोष राय यांनी त्यादिवशी नेमकं काय घडले याचा खुलासा केला आहे.
गुडगाव इथं एका नातेवाइकाकडं गेले होते | Satish Kaushik-Death
सतीश कौशिक यांच्या मागं पत्नी शशी आणि अकरा वर्षीय मुलगी वंशिका व मोठा आप्तपरिवार आहे. कौशिक हे गुडगाव इथं एका नातेवाइकाकडं गेले होते. रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. ते तातडीनं हॉस्पिटलकडं निघाले. हॉस्पिटलमध्ये बुधवारी मध्यरात्रीनंतर १ वाजताच्या सुमारास त्यांचा हृदयविकारानं मृत्यू झाला. शेवटच्या क्षणी त्यांचे मॅनेजर संतोष राय त्यांच्या सोबत होते. संतोष यांनी सतिश यांच्या शेवटच्या क्षणांबद्दल सांगितलं आहे.
अखेरच्या रात्री काय घडलं याबाबत संतोष राय यांनी सांगितले की, मी जवळपास ३४ वर्ष सतीश कौशिक यांच्यासोबत काम करतोय. बुधवारी रात्री जेवल्यानंतर कौशिक यांना काहीही लक्षणे जाणवली नाहीत. रात्री ८.३० वाजता जेवण उरकलं. ९ मार्चला सकाळी ८.५० वाजता फ्लाईटने मुंबईतला परतायचे होते. संतोष, लवकर झोप, उद्या सकाळी फ्लाईट पकडायची आहे असं त्यांनी म्हटल्यावर मी ठीक आहे सर असं म्हणत बाजूच्या खोलीत झोपायला गेलो असं त्यांनी म्हटलं.
त्यानंतर रात्री ११ वाजता मला फोन आला. संतोष, इथे ये, मला वायफाय पासवर्ड ठीक करायचा आहे. कागज २ सिनेमाच्या एडिटच्या दृष्टीने तो सिनेमा पाहायचा होता. कागज २ हा सिनेमा सतीश कौशिक यांनीच दिग्दर्शित केला आहे. रात्री ११.३० वाजता सिनेमा पाहायला सुरुवात केला त्यानंतर मी पुन्हा माझ्या खोलीत परतलो असं संतोष रायनं सांगितले.
रात्री १२.१५ वाजता ते जोरजोरात माझे नाव घेत ओरडू लागले. मी धावत त्यांच्या खोलीत गेलो आणि विचारलं काय झाले सर, का ओरडत आहात? तेव्हा त्यांनी मला श्वास घेण्यास त्रास होतोय. प्लीज मला डॉक्टरांकडे घेऊन चल, आम्ही तातडीने ते आणि मी कारच्या दिशेने गेलो. तिथे ड्रायव्हर आणि बॉडीगार्डही होते. जसे आम्ही हॉस्पिटलला निघालो तसे त्यांच्या छातीतील वेदना वाढल्या. लवकर चला, कौशिक यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवत संतोष, मला मरायचं नाही, वाचव असं म्हटलं. मला वंशिकासाठी जगायचंय. मी जगेन असं वाटत नाही. शशि आणि वंशिकाची काळजी घे असं त्यांनी सांगितले. ८ मिनिटांत आम्ही फॉर्टिस हॉस्पिटलला पोहचलो. त्याठिकाणी ते बेशुद्ध झाले होते असं संतोष राय यांनी म्हटलं.