Sanjay Shirsat vs Sushma Andhare: वेळेनुसार कसे बदलायचे हे सुषमा अंधारे यांना परफेक्ट माहिती आहे: संजय शिरसाट

0

मुंबई, दि.28: Sanjay Shirsat vs Sushma Andhare: शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. वेळेनुसार कसे बदलायचे हे सुषमा अंधारे यांना परफेक्ट माहिती आहे, त्या उत्तम ॲक्टर आहेत असे संजय शिरसाट म्हणाले. अंधारे यांची जुनी भाषणे पाहिली तर त्या बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच शरद पवार यांच्याबद्दल काय म्हणाल्या होत्या पहा असेही शिरसाट म्हणाले.

संजय शिरसाट भडकले… | Sanjay Shirsat vs Sushma Andhare

‘तो संज्या तुझं वय काय माझं काय, वडिलांना काय हाक मारता. आम्हाला वरातीचे घोडे बोलतात, मी जर बोललो की, महिलांचा अपमान केला आणि तुम्ही सगळ्याची उधळत बसायची हे चालणार नाही. तुम्हाला लढायचं तर समोर या, माझा बद्दल मी काहीही खपवून घेणार नाही जशास तसे उत्तर देणार गेली उडत ती आमदारकी, असं म्हणत आमदार संजय शिरसाट कमालीचे भडकले.

सुषमा अंधारे यांच्यावर खालच्या शब्दांत टीका केल्यामुळे संजय शिरसाट यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाली आहे. त्या तक्रारीनंतर संजय शिरसाट कमालीचे संतापले आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सुषमा अंधारेंनाच इशारा दिला आहे.

गेल्या आठवड्यात माझाकडे शिवसेनेचा एक मेळावा आयोजित केला होता त्यात माझं ते वक्तव्य होतं. या ज्या सुषमा अंधारे आहेत त्या चावी दिल्यासारख्या बोलत आहे. माझा भाऊ माझा भाऊ बोलत आमच्यावर जी टीका करत आहेत त्या माफ करायच्या का? जो व्हिडिओ माझा फिरतोय त्यात मी काय अश्लील बोललो असेल तर आमदारकीचा तातडीने राजीनामा देईन, असं आव्हानच शिरसाट यांनी दिलं.

आमच्या नेत्याच्या मतदारसंघात जाऊन ते शिव्या देत आहेत. महिला म्हणून ते आरोप करतात. या पूर्व ते हिंदु देवी देवता, बाळासाहेब, उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्याबाबत ते काय बोलल्या आहेत. मी त्यांची पत्रकार परिषद पाहून आलो ते काय बोलल्या. एखाद्याच्या मनात एक संतापाची भावना असते. त्या चांगल्या एक्टर आहेत. सुषमा अंधारे याच्यावर टीका केली तर तो संस्कारी नाही ही काय पद्धत आहे, असं शिरसाट म्हणाले.

मी तर थेट जातो तिथे…

एक चांगलं केलं त्यांनी त्या पत्रकार परिषदेत करोडपती केलं. 72 कोटी माझाकडे असल्याचा आरोप केला. ते आरोप करतात पण अंगलट आलं की रडतात, लोकं अज्ञान नाहीत. शब्द बदलणं हा त्यांचा व्यवसाय झाला. त्यांची ॲक्टिंग ते मान हलवणे हे पाठ झालंय. माझा विरोधात आंदोलनं केली राजकारणात समोरासमोर लढलं पाहिजे, तुमच्याकडे जे व्हिडिओ आलेत त्यातील दोन महिलांना विचारा जे करत आहेत ते योगय करत आहेत. संजय शिरसाटला ॲटक आला मंत्रिपद न मिळाल्याने आला ते काय म्हणतात. कुणा कुणा बद्दल ते काय नको ते बोललेत, लोकं आंधळे नाहीत उघड्या डोळयाने ते पाहतील. जे बोलायचं ते बोला उघडपणे पक्षाचं नुकसान करा. तुम्हाला वाटतं मला जे बोलत आहे. माझामुळे पक्षाची उन्नती होतं आहे. वैयक्तीत बाबतीत मी जात नाही. परळीत कुणाची धिंड काढली होती. मला ही जास्त बोलायला लावू नका तुम्हाला जसं खोलात जाता येत मी तर थेट जातो तिथे, असा इशाराही शिरसाट यांनी दिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here