Sanjay Raut | माझ्या नादाला लागू नका, तुमच्यासारखा पळून गेलो नाही: संजय राऊत

Sanjay Raut On Narayan Rane: संजय राऊत यांचा नारायण राणे यांना इशारा

0

मुंबई,दि.6: शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना इशारा दिला आहे. नारायण राणेंवर कुठला अग्रलेख लिहिलाय? नारायण राणेंसारखा डरपोक आणि पळपुटे आम्ही नाही. ईडीची नोटीस येताच पक्ष बदलणाऱ्यांपैकी नाही. कोणाला हिंमतीच्या आणि धाडसाच्या गोष्टी बोलता. मी अजूनपर्यंत त्यांच्यावर काहीच बोललो नाही. एकेकाळी ते आमचे सहकारी होते. धमक्या देऊ नका. धमक्या जर देणार असाल तर राजवस्त्र बाजूला काढा आणि या अशा शब्दात राऊत यांनी नारायण राणेंना इशारा दिला आहे. (Maharashtra Political News)

हेही वाचा शिंदे गटाचा महाविकास आघाडी ठाकरे गटाला मोठा धक्का

माझ्या नादाला लागू नका | Sanjay Raut On Narayan Rane

संजय राऊत म्हणाले की, माझ्या नादाला लागू नका, राजवस्त्र बाजूला काढा आणि या मग मी दाखवतो. झाकली मूठ सव्वालाखाची. हे काय मला जेलमध्ये पाठवणार, मी हिंमतीने माझ्या पक्षासाठी जेलमध्ये गेलोय. तुमच्यासारखा पळून गेलो नाही. ईडीने बोलवल्यावर शरणागती पत्करली नाही. नामर्द नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत असं त्यांनी सांगितले. 

Sanjay Raut On Narayan Rane
संजय राऊत

…या सर्वांची माझ्याकडे नोंद आहे | Maharashtra Political News

त्याचसोबत मला जेलमध्ये घाला, तुमच्या हातात न्यायालय आणि कायदा आहे का? तुम्ही कायद्याचे बाप झालात का? या सर्वांची माझ्याकडे नोंद आहे. ते सगळं चीफ जस्टीस ऑफ इंडियाला पाठवली आहे. इकडच्या प्रत्येकाचं वक्तव्य़ आम्ही पाठवत आहोत. नारायण राणेंची सगळी आर्थिक प्रकरणं काढली तर ते 50 वर्ष सुटणार नाहीत असा इशाराही संजय राऊत यांनी नारायण राणेंना दिला आहे.

जे कुणी गेलेत त्यांची नावेही…

जे येडेगबाळे पकडतात, पदाधिकारी म्हणून पक्षप्रवेश करून घेतात. नाशिकमधील शिवसेना जशीच्या तशी आहे. 2-4 दलाल ठेकेदार तिकडे गेले असतील. जमिनीवरचा शिवसैनिक आणि शिवसेना जागेवरच आहेत. जे कुणी गेलेत त्यांची नावेही नाशिककरांना माहिती नाहीत. मला माहिती नाहीत अशा शब्दात संजय राऊतांनी 50 पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया दिली.

संपूर्ण देशाचं पोट मुंबई भरतेय

योगी आदित्यनाथ यांच्याविषयी आम्हाला प्रेम, आदर, ते संत गृहस्थ आहेत. राजकारण बाजूला ठेवा. मुंबईत येऊन ते त्यांच्या राज्यासाठी विकासाची गंगा घेऊन जात असतील तर त्याचे आम्ही स्वागत करतो. चिंताग्रस्त होण्याचं कारण नाही. संपूर्ण देशाचं पोट मुंबई भरतेय. उत्तर प्रदेश, बिहार, ओडिसा असेल या राज्यातील जनता इथं राहतेय त्यांना आम्ही प्रेमानं सांभाळतोय असं संजय राऊत म्हणाले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here