खासदार संजय राऊत यांचे श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप

0

मुंबई,दि.21: Sanjay Raut News: ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राऊत यांनी पोलीस आयुक्तांना आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. राऊत यांनी आपल्यावर हल्ला होईल, अशी भीती व्यक्त केली आहे. अधिक गंभीर बाब म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खा. श्रीकांत शिंदे यांनी हल्ल्याची जबाबदारी एका गुंडाला दिली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी यासंदर्भातील एक पत्र लिहिलं आहे.

राऊत यांनी ठाणे पोलीस आयुक्त तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भातील पत्र दिलं आहे. त्या पत्रात पुढीलप्रमाणे उल्लेख आहे.

पत्रातील मजकूर | खासदार संजय राऊत

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर लगेच माझी सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे हटवण्यात आली. याबाबत मी आधीच आपल्याला कळविले आहे. या काळात सध्याच्या सत्ताधारी पक्षाचे आमदार तसेच त्यांनी पोसलेल्या गुंड टोळ्यांकडून मला धमक्या देण्याचे प्रकार घडले. मी त्याबाबतही आपणास वेळोवेळी कळविले आहे. आजच माझ्याकडे पक्की माहिती आली आहे की, ठाण्यातील एक गुंड राजा ठाकूर यास माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खा. श्रीकांत शिंदे यांनी दिली असून लवकरच तो माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. मी संसद सदस्य, सामनाचा कार्यकारी संपादक, शिवसेना नेता असलो तरी एक जबाबदार नागरिक म्हणून ही माहिती आपणास देत आहे – आपला नम्र- संजय राऊत

आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असून ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याचं संजय राऊत यांनी नाव घेतलं आहे. या राजा ठाकूरला खासदार श्रीकांत शिंदे यांनीच सुपारी दिली असल्याचा मोठा आरोप संजय राऊतांनी केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here