sanjay raut: aimim च्या भाजपाला पराभूत करण्यासाठी एकत्र येण्याच्या आवाहानावर संजय राऊत यांनी दिले हे उत्तर

0

मुंबई,दि.१९: sanjay raut on aimim: ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाने भाजपाला पराभूत करण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीबरोबर एकत्र येण्याची ऑफर दिली आहे. AIMIM चे खासदार इम्तियाज जलील (imtiyaz jaleel) आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांच्यात एक बैठक झाल्याचे समोर आले आहे. इम्तियाज जलील यांनी भाजपाला पराभूत करण्यासाठी एकत्र येण्याची ऑफर दिली होती. एमआयएमने राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र येऊन लढण्याची ऑफर दिली आहे.

एक खासदार, २९ नगरसेवक, दोन आमदार असलेल्या एमआयएमची राष्ट्रवादीला असलेली ऑफर सध्या चर्चेत आली आहे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील आणि राज्याचे आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते राजेश टोपे यांच्यात झालेल्या भेटीनंतर ही चर्चा सुरु झाली आहे. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी प्रतिक्रिया देताना एमआयएमसोबत उघड किंवा छुपी हातमिळवणी होऊ शकत नाही हे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा maharashtra: भाजपला पराभूत करण्यासाठी AIMIM पक्षाचा मोठा निर्णय

“महाराष्ट्रात तीन पक्षांचेच सरकार आहे आणि तेच राहील. यात चौथा कोण पाचवा कोण यामध्ये तुम्ही कशाला पडला? शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या विचारांनी चालणारे पक्ष आहेत. हेच आमचे आदर्श आहेत. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या पुढे कबरीपुढे जाऊन गुढघे टेकतात आणि औरंगजेब त्यांचा आदर्श आहे ते महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाही. एमआयएम आणि भाजपाची छुपी युती आहे हे तुम्ही उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये पाहिलेले आहे. जे आधीच भाजपाबरोबर छुप्या युतीमध्ये काम करत आहेत त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीचा कुठलाही संबंध येऊ शकत नाही,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

“एमआयएम भाजपाची बी टीम असल्याचे आम्ही उत्तर प्रदेशमध्ये पाहिले आहे. जर त्यांना उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचा पराभव करायचा होता तर त्यांनी खूप काळजीपूर्वक पावले टाकायला पाहिजे होती. औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणारे कोणीही असतील ते महाराष्ट्राचे, शिवसेनेचे आणि राज्यातल्या कोणत्याही पक्षाचे आदर्श होऊ शकत नाही. त्यांच्याबरोबर उघड किंवा छुपी हातमिळवणी होऊ शकत नाही. ज्यांच्याबरोबर त्यांची छुपी हातमिळवणी आहे ती त्यांना लखलाभ ठरो,’ असे संजय राऊत म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here