Sanjay Raut: संजय राऊत यांचे पत्रकार मृत्यू प्रकरणी खळबळजनक ट्विट

Sanjay Raut: मंत्री उदय सामंत यांनी राऊत यांच्या ट्विटनंतर स्पष्टीकरण दिले आहे

0

मुंबई,दि.११: Sanjay Raut On Shashikant Warishe Murder: राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे (Shashikant Warishe) यांची हत्या झाल्याचा दावा अनेकजण करत आहेत. ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना या हत्याप्रकरणावरून पत्रही लिहिले आहे. या पत्रानंतर राऊत यांनी आपल्या ट्विटर खात्यावर वारिशे यांच्या हत्या प्रकरणावर भाष्य करताना शिंदे गटातील नेते तथा मंत्री उदय सामंत यांचा एक फोटो ट्वीट केला आहे. तसेच करत शशिकांतचा खुनी पंढरीनाथ आंबेरकर कोणाबरोबर? अस सवालही त्यांनी केला आहे. राऊतांच्या या ट्वीटनंतर एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, उदय सामंत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

तो फोटो काढला याचा अर्थ मी त्याला…

“संजय राऊतांना जो फोटो ट्वीट केला आहे तो जुना आहे. हा फोटो नाकारण्याचे काही कारण नाही. कारण मी मंत्री होऊन रत्नागिरीला गेलो होते. अनेक लोक आजूबाजूला येऊन फोटो काढतात. तसाच तोही एक फोटो होता. तो फोटो काढला याचा अर्थ मी त्याला पाठबळ दिले असा त्याचा अर्थ होत नाही. कारण त्या व्यक्तीचे राज्यातील अनेक नेत्यांसोबत फोटो आहेत. महाराष्ट्राच्या जनतेही ते पाहिलेले आहे. जो कोणी नेता त्याच्यासोबत आहे, तो यामध्ये सामील आहे, असे घाणेरडे राजकारण करणे योग्य नाही असे मला वाटते,” अशी भूमिका उदय सामंत यांनी मांडली.

…तर मी राजकारण सोडायला तयार आहे

“संजय राऊत यांनी पत्रकाराच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. या मागणीचे मी पूर्ण समर्थन करतो. माझी, माझ्या नातेवाईकांची त्या ठिकाणी एक इंचही जमीन असेल तर मी राजकारण सोडायला तयार आहे. मात्र जमीन नसेल तर ज्यांनी तसे आरोप केले आहेत, त्यांनी राजकारण सोडायला हवे,” असे आव्हानही उदय सामंत यांनी केले.

संजय राऊत यांनी काय म्हटले ट्विटमध्ये? | Sanjay Raut On Shashikant Warishe Murder

संजय राऊत यांनी ट्विटरवर उदय सामंत यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोचा संबंध त्यांनी शशिकांत वारिशे मृत्यू प्रकरणाशी जोडला आहे. ट्वीटमध्ये संजय राऊत “व्यक्ती को कुचल देनेसे विचार नही मरता. पत्रकार शशिकांत वारिशे यांचा खून राजकीय आहे. नाणार परिसरात नेत्यांनी मोठ्या प्रमाणात बेनामी जमीन खरेदी केली आहे. त्या सर्व सावकार आणि जमीनदारांनी मिळून शशिकांत यांचा काटा काढण्यासाठी सुपारी दिली. शशिकांतचा खुनी पंढरीनाथ आंबेरकर कोणाबरोबर?” असे संजय राऊत आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here