Sanjay Raut: प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत संजय राऊत यांचं मोठं विधान

Maharashtra Politics: ...तर 2024 साली त्यांनीही तुरुंगात जायची तयारी ठेवावी

0

मुंबई,दि.4: Sanjay Raut On Prakash Ambedkar | वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्याबाबत शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठं विधान केलं आहे. ‘प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेमध्ये चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीला याची पूर्ण कल्पना आहे. आमच्या चर्चेची माहिती अधिकृतपणे दिली आहे. कुणाचा विरोध आहे, किंवा नाही हे भविष्यात कळेल. पण, आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दलित जनता एकवटली आहे. वंचित आघाडी एकत्र आली तर राज्यात नक्की परिवर्तन घडेल’ असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. (Maharashtra Politics)

हेही वाचा Crime News: WhatsApp ग्रुपमधून काढल्यामुळे ग्रुप ॲडमिनला बेदम मारहाण, जीभ कापली

…तर 2024 साली त्यांनीही तुरुंगात जायची तयारी ठेवावी | Maharashtra Politics

“संजय राऊतांनी पुन्हा एकदा तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी”, असं विधान दीपक केसरकरांनी केल्याबाबत आज माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता संजय राऊतांनी केसरकरांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. “आमच्या पक्षासाठी, महाराष्ट्रासाठी आम्ही जाऊ पुन्हा जेलमध्ये. आम्ही तुमच्यासारखे पळपुटे, लफंगे नाही आहोत. तुम्ही म्हणजे न्यायालय नाही. कायदा नाही. दीपक केसरकर खरंच असं बोलले असतील, तर 2024 साली त्यांनीही तुरुंगात जायची तयारी ठेवावी, सगळं तयार आहे”, असं राऊत यावेळी म्हणाले.

Sanjay Raut On Prakash Ambedkar
संजय राऊत

प्रकाश आंबेडकर सोबत आले तर… | Sanjay Raut On Prakash Ambedkar

“महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी शक्ती प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एकवटली आहे. प्रकाश आंबेडकर आणि त्यांचं संघटन आपल्यासोबत आलं, तर महाराष्ट्रात आणि देशात परिवर्तनाची नांदी सुरू होईल”, असं राऊत म्हणाले.

शिवसेना आणि शिंदे गटामध्ये रस्सीखेच सुरू | Sanjay Raut

शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येण्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटामध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. शिंदे गट आज जोगेंद्र कवाडे यांच्यासोबत युती जाहीर करणार आहे. तर शिवसेनेनंही वंचित आघाडीला एकत्र घेण्याची तयारी सुरू केली आहे. यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

राज्य सरकार उलथवून लावण्यासाठी…

‘प्रकाश आंबेडकर हे सकारात्मक आहे. शिवशक्ती आणि भीमशक्ती ही ताकद आहे. सध्या राज्यात ज्या प्रकारचे राज्य सरकार आहे, ते उलथवून लावण्यासाठी एकत्र येणे गरजेच आहे, असं परखड मत संजय राऊतांनी व्यक्त केलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here