Sanjay Raut: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर संजय राऊत यांची सूचक प्रतिक्रिया

Sanjay Raut News: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुनावणी 14 फेब्रुवारीला

0

मुंबई,दि.10: Sanjay Raut On Maharashtra Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शिवसेनेतील फूट आणि राज्यातील सत्तासंघर्षांसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, सत्तासंघर्षाचा पेच आणखी लांबणीवर पडला आहे. कारण या प्रकरणाची सुनावणी 14 फेब्रुवारीला होईल, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांनी दिली आहे. दरम्यान, याबाबत खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी | Maharashtra Political Crisis

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्ती एम आर शाह सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचुड. न्यायमूर्ती क्रिष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती पी. एस नरसिंम्हा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला. तर बाळासाहेबांची ठाकरे पक्षाकडून हरीश साळवे यांनी युक्तीवाद केला. पुढील सुनावणी ही 14 तारखेला होणार आहे.

Sanjay Raut On Maharashtra Crisis
संजय राऊत

काय म्हणाले संजय राऊत? | Sanjay Raut On Maharashtra Crisis

“आमचं घटनेवर प्रेम आहे. १४ फेब्रुवारीपासून घटनापीठ सलग सुनावणी घेणार आहे. ही आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आज मुख्य न्यायधीशांनी सांगितलं की आम्ही महाराष्ट्राच्या प्रकरणावर आम्ही 14 फेब्रुवारीपासून सुनावणी घेऊ. 14 फेब्रुवारीचा दिवस व्हॅलेंटाईन दिवस आहे. सर्व काही प्रेमाने होईल”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

दरम्यान, यावेळी खासदार अनिल देसाई देखील उपस्थित होते. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, “ही सुनावणी सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार की नाही, याबाबत निश्चित सांगता येणार आहे. मात्र, 14 फेब्रुवारीपासून याबाबत सलग सुनावणी होणार आहे. ही सुनावणी सात न्यायमूर्तींच्या घटनाफीठापुढे होते की पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे होते हे बघावं लागेल”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here