संभाजीराजे छत्रपती मोठा निर्णय घेण्याची शक्यता, संभाजीराजेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा

0

कोल्हापूर,दि.२४: संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. संभाजीराजेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी (CM Uddhav Thackeray) चर्चा झाली आहे. राज्यसभेच्या सहाव्या उमेदवारावरून शिवसेना आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यातील तिढा कायम आहे. दोन्ही बाजू आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने सोमवारी याबाबत निर्णय होऊ शकला नाही. शिवबंधन बांधून शिवसेनेतर्फे निवडणूक लढणार नाही, या आपल्या भूमिकेवर संभाजीराजे ठाम राहिल्याने शिवसेनेने दुसरा उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे.  मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

संभाजीराजे छत्रपती कोल्हापूरहून मुंबईसाठी रवाना झाले आहेत. त्यांनी याआधी माध्यमांशी संवाद साधत मोजकीच प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे छत्रपतींचा सन्मान राखतील अशी अपेक्षा असल्याचं, मत संभाजीराजे यांनी व्यक्त केलं आहे. तसेच उद्धव ठाकरेंसोबत सविस्तर चर्चा झालीय. सविस्तर बोलणं झालेलं आहे. पुढे काय करायचं ते सविस्तर ठरलेलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे ते त्याप्रमाणे करतील, असं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं आहे. 

संभाजीराजे यांनी पॅलेसमध्ये आज मालोजीराजे यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. संभाजीराजेंच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाबाबत आता पुन्हा उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. संभाजीराजे आज मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. संभाजीराजे आजच मुंबईत दाखल होणार आहेत. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here