दि.4: Russia Ukraine War Updates: गेल्या आठ दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia Ukraine War) सुरू असलेले युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही आहे. दरम्यान, शुक्रवारी युक्रेनमधील युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर (Zaporizhzhia) हल्ला करून तो ताब्यात घेतला. दुसरीकडे, युक्रेनचे लष्कर रशियाचे मोठे नुकसान झाल्याचा दावा करत आहे. युक्रेनच्या सैन्याने राजधानी कीवजवळील Bucha शहर पुन्हा ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे.
याआधी गुरुवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनचे लष्कर सामान्य लोकांचा मानवी ढाल म्हणून वापर करत असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. युक्रेनच्या लष्कराने 3000 भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवले असून रशियन सैनिक परदेशी लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत करत असताना त्यांना बाहेर पडू दिले जात नाही, असा दावा पुतीन यांनी केला आहे.
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज 9वा दिवस आहे. दोन्ही देशांमधील चर्चेची दुसरी फेरीही अनिर्णित असून, लवकरच तिसरी फेरी होणार आहे.
Zaporozhye न्यूक्लियर पॉवर प्लांट (Energodar) असलेल्या प्रदेशाच्या महापौरांची प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले की, शहर आणि अणु केंद्र यांच्यात कोणतीही लढाई झाली नाही. या प्लांटवर झालेल्या हल्ल्यानंतर रशियाने त्यावर कब्जा केला आहे.