Russia Ukraine War: रशियाचा हल्ला यूक्रेनच्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर बेतला आहे

0

कीव,दि.२५: Russia Ukraine War: रशियाने (Russia) यूक्रेनवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. रशिया यूक्रेन (Russia Ukraine War) वादात सामान्य माणसाला झळ बसत आहे. अनेक सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. रशियन सैन्यानं राजधानी कीववर कब्जा मिळवण्यासाठी सैन्याची कारवाई सुरू केली आहे. रशियाच्या यूक्रेनवर हल्ल्याचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.

मिसाइल, रॉकेट हल्ले घडवून आणले जात आहे. अशात मॉस्कोद्वारे सुरु असलेल्या या हल्ल्याचा एक भयंकर व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून रशिया यूक्रेनविरोधात क्रूर पद्धतीनं आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

रशियाचा हल्ला यूक्रेनच्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर बेतला आहे. व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, यूक्रेनच्या रस्त्यावरुन जाणाऱ्या एका सायकलस्वारावर अचानक हवेतून बॉम्ब हल्ला होता. त्यात चहुबाजूने आगीच्या ज्वाला उठतात. ४० सेकंदच्या या व्हिडीओनं तुमच्याही अंगावर काटा येईल. रशियानं गुरुवारी यूक्रेनवर हल्ला केला. युद्धाच्या पहिल्या दिवशी १३७ लोकांचा मृत्यू झाला तर ३०० हून अधिक जखमी झाले आहेत. आजही यूक्रेनवर हल्ले सुरुच आहेत.

यूक्रेनच्या अनेक शहरांमध्ये स्फोटांच्या आवाजानं हाहाकार माजला आहे. रशिया यूक्रेन युद्धात शेकडो सैनिक जखमी झाले आहेत. या युद्धात निर्दोष लोकंही मारली जात आहेत. रशियाच्या हवाई हल्ल्यात ठार झालेला सायकलस्वार त्यापैकीच एक आहे. लोकं जीव वाचवण्यासाठी इकडेतिकडे पळत आहेत. सुरक्षित स्थळ गाठण्यासाठी रेल्वे, रस्त्यांवर गर्दी दिसून येते. तर यूक्रेनच्या अधिकृत सूत्रांनुसार, शुक्रवारचा दिवस यूक्रेनसाठी ब्लॅक फ्रायडे सिद्ध होण्याची शक्यता आहे. कारण रशियाने हल्ल्याची तीव्रता दुप्पट केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here