रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना करण्यात आले हे आवाहन

0

सोलापूर,दि.23: सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवाना जिल्हा अधीक्षक कृषि अधिकाऱ्याने आवाहन केली आहे की, रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यातील युध्दामुळे नागरिक खत (Fertilizer) बाजारात खत तुटवडा होण्याची शक्यता असून खताच्या किंमती वाढण्याची दाट शक्यता आहे. भारत सर्वाधिक खताची (Fertilizer) आयात करणारा देश असून युध्दजन्म परिस्थितीचा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी खतांचा आवश्यक साठा करुन ठेवण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.

शेतकरी बांधवाना सद्यस्थितीत बाजारात मुबलक प्रमाणात खत साठा उपलब्ध असून येणाऱ्या या खरीप हंगामासाठी खतांचा आवश्यक साठा करुन ठेवावा. रशिया व युक्रेन युध्दाच्या पार्श्र्वभूमिवर ऐन हंगामात खतांचा तुटवडा भासणार नाही. त्यामुळे शेतकरी बांधवानी शक्य असेल तेवढी आवश्यक खते खरेदी करुन ठेवण्याचे आवाहन कृषि विभाागामार्फत करण्यात येत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here