मीरपूर,दि.९: Rohit Sharma Tweet: दुखापतीनंतर रोहित शर्माच ट्विट झालं जगभरात व्हायरल झालं आहे. रोहित शर्माचे व्हायरल होणारे ट्विट (Rohit Sharma Tweet) जुने आहे. रोहित शर्माला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे रोहित आता बांगलादेशच्या वनडे मालिकेत खेळणार नाही. पण रोहितच्या दुखापतीपेक्षा त्याचे एक ट्विट सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. रोहितच्या या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधले असून ते सध्याच्या घडीला जगभरात चांगलेच व्हायरल झाले आहे.
Rohit Sharma Tweet: रोहित शर्माला झाली गंभीर दुखापत
दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माला गंभीर दुखापत झाली. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना रोहित शर्माच्या अंगठ्याला दुखापत झाली. नंतर संघ हरताना पाहून तो आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. रोहितने यावेळी संघाला जिंकवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. हिटमॅनने संघासाठी फटकेबाजी करताना अर्धशतक झळकावले, मात्र त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. पण त्यानंतर एक अपडेट समोर आली की तो तिसरा आणि शेवटचा वनडे सामना खेळू शकणार नाही. रोहित आता दुखापतीमुळे कसोटी मालिका खेळणार की नाही, याबाबत अजूनही स्पष्ट निर्णय समोर आलेला नाही. पण रोहितच्या एका ट्विटने मात्र जगभरात त्याची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.
Rohit Sharma Tweet 2019: रोहित शर्माच्या जुन्या ट्विटची चर्चा
रोहित शर्माने आपल्या या ट्विटमध्ये (Rohit Sharma Tweet 2019) दोन वाक्य लिहिली आहेत. रोहितने या ट्विटमध्ये तो फलंदाजीसाठी मैदानात उतरत असतानाचा फोटो लावला आहे. रोहितने त्यानंतर या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ” मी फक्त संघासाठी मैदानात उतरत नाही, तर मी माझ्या देशासाठी मैदानात उतरतो.” दुखापतीनंतर रोहितचे हे ट्विट आता चांगलेच व्हायरल झाले आहे. कारण बोटाला गंभीर दुखापत होऊनही रोहित या सामन्यासाठी देशासाठी फलंदाजीला उतरला होता.
Rohit Sharma Tweet 2019: २०१९ केलेले ट्विट व्हायरल
रोहित जेव्हा फलंदाजीला आला होत,तेव्हा भारतीय संघ पराभवाच्या छायेत होता. पण रोहितने फलंदाजीला आल्यावर धडाकेबाज फटकेबाजी केली आणि आपले अर्धशतकही झळकावले. रोहितने हा सामना अखेरचा चेंडूपर्यंत नेला होता. अखेरच्या चेंडूवर भारताला विजयासाठी सहा धावांची गरज होती आणि त्यावेळी रोहित शर्मा हा स्ट्राइकवर होता. त्यामुळे रोहितने षटकार खेचला असता तर भारतीय संंघ हा सामना जिंकू शकला असता. पण या चेंडूवर रोहितला षटकार खेचता आला नाही आणि त्यामुळे भारताचा पाच धावांनी पराभव झाला. पण रोहितने यावेळी आपल्या दुखापतीची तमा बाळगली नाही आणि तो देशासाठी मैदानात उतरला. रोहितचे हे ट्विट त्याच्या या गोष्टीशी जुळणारे आहे. त्यामुळेच रोहितने जे २०१९ साली जे ट्विट केले होते ते आता चांगलेच व्हायरल झालेले आहे.