Rohit Pawar: आता डोक्यावरून पाणी चाललंय, महाराष्ट्राचं ‘पाणी पाजण्याची’ वेळ आलीय: रोहित पवार

Rohit Pawar On Sudhanshu Trivedi: आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांच्यावर जोरदार टीका केली आहे

0

पुणे,दि.20: Rohit Pawar on Sudhanshu Trivedi: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्त्यवामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं आहे.

विनायक दामोदर सावरकर यांनी इंग्रज सरकारला पत्र लिहून त्यांची माफी मागितली होती, असं राहुल गांधींनी चिठ्ठी दाखवत म्हटलं होतं. यानंतर आता भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी विधान केलं आहे, की छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाचवेळा माफी मागितली होती. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा राजकारण तापताना दिसत आहे.

रोहित पवार यांनीही ट्विट करत सुधांशू त्रिवेदी यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं, की छत्रपती शिवाजी महाराजांवर आता #SudhanshuTrivedi हा भाजपचा जंतू दिल्लीत वळवळला. आपल्या दैवतांवर एकेकाने चिखलफेक करून दुसऱ्या कुणाचं प्रतिमासंवर्धन करण्याचा तर हा डाव नाही ना? असा सवाल त्यांनी ट्विटमधून उपस्थित केला.

पुढे रोहित पवार म्हणाले, की आता डोक्यावरून पाणी चाललंय.त्यामुळं डोक्यात पाणी भरलेल्यांना महाराष्ट्राचं ‘पाणी पाजण्याची’ वेळ आली आहे, असा इशारा त्यांनी दिला.

सुधांशू त्रिवेदी काय म्हणाले?

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीनाम्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र आधीच्या काळात अनेक लोक सुटकेसाठी आणि अडचणीतून बाहेर पडण्यासाठी माफी मागत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबला पाच वेळा पत्र लिहिलं होतं. मग त्याचा अर्थ काय होतो? ब्रिटीश संविधानाची शपथ तर नाही घेतली ना? असं सुधांशू त्रिवेदी म्हणाले होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं वादग्रस्त वक्तव्य

याआधी शनिवारीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या एका विधानामुळेही राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली होती. ‘ छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते. तर नितीन गडकरी हे सध्याचे आदर्श आहेत’, असं राज्यपालांनी म्हटलं होतं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here