Rohit Pawar On Sharad Pawar: अजित पवारांच्या बंडानंतर रोहित पवारांनी शेअर केलेला व्हिडीओ व्हायरल

0

मुंबई,दि.2: Rohit Pawar On Sharad Pawar: अजित पवारांच्या बंडानंतर रोहित पवारांनी शेअर केलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादीवरील वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar Tweet) एक व्हिडीओ शेअर करुन आलं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ‘वाट आहे संघर्षाची… म्हणून थांबणार कोण? सह्याद्री सोबत आहे महाराष्ट्र सारा’ अशा आशयाचं एक व्हिडीओ ट्वीट आमदार रोहित पवारांनी केलं आहे. लढणं आणि जिंकणं हे तर महाराष्ट्राच्या रक्तातच आहे असंही त्यांनी म्हटलंय. आमदार रोहित पवारांनी या व्हिडीओतून शरद पवारांच्या संघर्षाची कथा शेअर केली असून तो व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Rohit Pawar On Sharad Pawar)

रोहित पवारांनी ट्विट केला व्हिडिओ | Rohit Pawar On Sharad Pawar

वाट आहे संघर्षाची…
म्हणून थांबणार कोण?
सह्याद्री सोबत आहे महाराष्ट्र सारा
दऱ्या खोऱ्यातून अन् गाव शिवारातून वाहणारा वारा…
मग संघर्षाला घाबरतंय कोण?
लढणं आणि जिंकणं हे तर महाराष्ट्राच्या रक्तातच…

राज्यातील घडत असलेल्या घडामोडीवर, राष्ट्रवादीच्या फुटीवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी आमदार रोहित पवार हे शरद पवार यांच्या बाजूला बसल्याचं दिसून आलं. त्यामुळे पवार घराण्यातील व्यक्ती असलेले रोहित पवार हे शरद पवारांच्या पाठिशी असल्याचं स्पष्ट झालं आहे. 2019 सालच्या अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीवेळीही रोहित पवारांनी लागोलाग सूचक प्रतिक्रिया देत आपण शरद पवारांच्या सोबत असल्याचं सांगितलं होतं. आताही त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. शरद पवारांच्या संघर्षाचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे.

गडी एकटा निघाला असं गाणं असलेला हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओतून आमदार रोहित पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना एक प्रकारची भावनिक साद घातल्याचं सांगितल जातंय.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here