रोहित पवार यांनी केला अजित पवार गटातील आमदारांबाबत मोठा गौप्यस्फोट

0

मुंबई,दि.5: शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटातील आमदारांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. tv9 मराठीशी बोलताना रोहित पवारांनी गौप्यस्फोट केला आहे. अजित पवार यांनी बंड करत राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह मिळवले. निवडणूक आयोगोने राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह अजित पवार गटाला दिले. शरद पवार गट महाविकास आघाडीचा भाग आहे. तर अजित पवार गट महायुतीचा भाग आहे.

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची युती आहे. तर काँग्रेस, शरद पवार गट व ठाकरे गट एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. अजित पवार यांच्याकडे शरद पवार गटाच्यामानाने आमदारांचे जास्त संख्याबळ आहे.

रोहित पवार यांचा गौप्यस्फोट

आगामी लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर अजित पवार गटात गेलेले राष्ट्रवादीचे 22 आमदार परत शरद पवारांकडे येतील, असा मोठा दावा रोहित पवार यांनी केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रोहित पवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया देत असताना याबाबत गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे काहीतरी मोठं घडतंय याचे स्पष्ट संकेत मिळताना दिसत आहेत.

रोहित पवार म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणतील तेच अजित पवार यांना मान्य करावे लागेल. महाराष्ट्रात अमित शाह अजित पवार यांना लोकसभेच्या फक्त 4 जागा तर एकनाथ शिंदे यांना 10 जागा देतील. त्यांना ते मान्य करावे लागेल.

काय म्हणाले रोहित पवार?

“अजित पवार गटातला एक नेता आमदार एकत्रित करतोय. 10 ते 12 आमदार आहेत ते भाजपाच्या चिन्हावर लढायचं म्हणत आहेत. राहिलेले 22 आमदार हे वेगळी भूमिका घेतील. त्यांच म्हणणं असेल की शरद पवारांसोबत चला. मग त्यांच्या पक्षात कोण राहील?”, असा सवाल करत रोहित पवार यांनी अजित पवार गटाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here