Rohit Pawar: खळबळजनक वक्तव्यानंतर रोहित पवारांनी दिले स्पष्टीकरण

0

मुंबई,दि.19: Rohit Pawar: खळबळजनक वक्तव्यानंतर रोहित पवारांनी (Rohit Pawar) स्पष्टीकरण दिले आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शिवसेना फोडल्यानंतर आता विरोधकांचं पुढचं लक्ष्य राष्ट्रवादी काँग्रेस आहे. पवार कुटुंब फोडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचं वक्तव्य केलं होतं. रोहित पवारांच्या या वक्तव्यानंतर खळबळ माजली, अखेर अजित पवारांना (Ajit Pawar) या वक्तव्यावर सारवासारव करावी लागली.

काहीतरी गैरसमज झाला असेल. रोहित पवार असं बोलूच शकत नाही. तसं काही असेल तर त्यांना मी दुरुस्त करायला सांगतो. रोहितशी बोलावं लागेल, त्याने नेमकं कशामुळे हे वक्तव्य केलं ते पाहावं लागेल. अनेकवेळा माध्यमांमध्ये वक्तव्याचा विपर्यास होतो, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं.

अजित पवारांच्या या स्पष्टीकरणानंतर पुन्हा रोहित पवार यांची प्रतिक्रिया आली, पण रोहित पवारांच्या या प्रतिक्रियेमुळे पुन्हा एकदा वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या.

रोहित पवारांचं स्पष्टीकरण

‘फोडाफोडीचं राजकारण होत आहे. शिवसेना हा मोठा पक्ष फोडण्यात आला. एक मोठा पक्ष फोडल्यानंतर फोडाफोडीचंच राजकारण करायचं असेल, तर दुसरा मोठा पक्ष हा राष्ट्रवादी आहे. एक मोठा पक्ष फोडल्यानंतर पुढचं टार्गेट हे राष्ट्रवादी असू शकतं, असं मी बोलता बोलता म्हणालो. मी भाजप म्हणालो नव्हतो, तर विरोधात असलेल्या पक्षाचं, असं मी म्हणालो होतो,’ असं स्पष्टीकरण रोहित पवारांनी दिलं.

रोहित पवारांच्या या वक्तव्यामुळे वादावर पडदा पडण्याऐवजी पुन्हा एकदा वेगळ्या चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. आपण भाजपचं नाव घेतलं नाही तर विरोधात असलेल्या पक्षाबद्दल बोललो, मग रोहित पवारांचा इशारा भाजपकडे नाही तर शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे का आणखी कुणाकडे? याबाबत मात्र सस्पेन्स तयार झाला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here