मुंबई,दि.६: Restrictions In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या (Corona Cases In Maharashtra) वाढत आहे. ओमिक्रॉन (Omicron Cases In Maharashtra) रुग्णांची संख्याही वाढत आहे. अनेक राज्यात मिनी लॉकडाऊन (Mini Lockdown) लावण्यात आला आहे. राज्यात मुंबईत सर्वाधिक रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात कालची (दि.५) कोरोना रुग्णांची संख्या २६ हजारांपार नोंदवली गेली आहे. ही आकडेवारी लक्षात घेता राज्यात लवकरच कठोर निर्बंध लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार नवीन निर्बंधांसंबंधी आज, गुरुवारी महत्वाची बैठक होऊ शकते आणि त्यात काही निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रात बुधवारी कोरोनाचे २६, ५३८ नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनाचे १५,१६६ रुग्ण आढळले आहेत. ही आतापर्यंतची सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत हा आकडा ४३.७१ टक्क्यांनी वाढला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबईसह महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंधांबाबत आज, गुरुवारी महत्वाची बैठक होण्याची दाट शक्यता आहे. यात कार्यालयीन उपस्थिती आणि दुकाने, रेस्तराँच्या वेळांबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. लोकल प्रवासावरील निर्बंधांबाबतही काही निर्णय घेतला जाऊ शकतो. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव बघता, लवकरच नवीन कठोर निर्बंध लादले जाऊ शकतात, यात काहीच शंका नाही, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.