फ्रिजच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत होरपळून तीन जणांचा मृत्यू 

0
फ्रिजच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत होरपळून तीन जणांचा मृत्यू

मुंबई,दि.११: घरातील फ्रिजचा स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत होरपळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गाढ झोपेत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. गोरेगाव पश्चिम भगतसिंग नगर नं.2 येथील एका घरात मध्यरात्री ही घटना घडली आहे. आगीत वडिलांसह दोन मुलांचा होरपळून मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.

या आगीत संजोग पावसकर (48) यांच्यासह त्यांची दोन मुले हर्षदा पावसकर (19) आणि कुशल पावसकर (12) यांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. फ्रिजचा स्फोट झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

गोरेगाव पोलिसांनी याप्रकरणी सध्या एडीआर दाखल केला आहे. आगीचे नेमके कारण काय होते आणि फ्रिजचा स्फोट कशामुळे झाला, याचा सखोल तपास गोरेगाव पोलीस ठाणे आणि अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहे.

या मुलांची आई रात्रपाळीच्या कामावर गेली होती. त्या घरी नसल्यामुळे या भीषण आगीतून सुदैवाने त्या बचावल्या, मात्र एका रात्रीत आपले संपूर्ण कुटुंब गमावल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here