दि.२२: Recruitment 2022: सुशिक्षित बेरोजगारांसाठी आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) मध्ये लवकरच काही पदांसाठी मोठी भरती होणार आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक किंवा आरबीआय ग्रेड बी (RBI Grade B) भरतीची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने विविध विभागांमध्ये ग्रेड बी ऑफिसर्स आणि असिस्टंट मॅनेजरच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी एकत्रित जाहिरात प्रसिद्ध केली आहे. याअंतर्गत एकूण ३०३ पदे भरली जाणार आहेत. यामध्ये ग्रेड बी अधिकाऱ्यांची २९४ पदे आणि सहाय्यक व्यवस्थापकाच्या ९ पदांचा समावेश आहे.
RBI ने जारी केलेल्या संयुक्त जाहिरातीनुसार, जाहिरात केलेल्या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सोमवार, २८ मार्चपासून म्हणजेच पुढील आठवड्यात सुरू होईल. उमेदवारांना १८ एप्रिल २०२२ च्या संध्याकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर, ग्रेड बी अधिकारी (सामान्य) पदांसाठी पहिल्या टप्प्यातील ऑनलाइन परीक्षा २८ मे रोजी आणि दुसऱ्या टप्प्याची ऑनलाइन परीक्षा २५ जून २०२२ रोजी होणार आहे.
अर्थशास्त्र आणि सांख्यिकी विभागांसाठी पहिल्या टप्प्यातील परीक्षा २ जुलै रोजी आणि दुसरा टप्पा ६ ऑगस्ट रोजी घेण्यात येईल. दुसरीकडे सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी ऑनलाइन लेखी परीक्षा २१ मे २०२२ रोजी होणार आहे.
पात्रता
आरबीआय ग्रेड बी भर्ती २०२२ च्या जाहिरातीमध्ये पात्रतेची अधिकृत माहिती अद्याप देण्यात आली नाही. पण गेल्या वर्षीच्या गेल्या वर्षीच्या नोटिफिकेशननुसार, अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इतर उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असून किमान ६० टक्के गुण असावेत. किमान ५५ टक्के गुणांसह पीजी उत्तीर्ण झालेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात. दुसरीकडे, बँकेने विहित केलेल्या तारखेनुसार उमेदवारांचे वय २१ वर्षांपेक्षा कमी आणि ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
अर्ज प्रक्रिया
आरबीआय ग्रेड बी भरती २०२२ साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट http://rbi.org.in वर जा. होमपेजवरील ऑनलाइन अर्जाच्या लिंकद्वारे अर्ज भरा. अर्ज प्रक्रिया जाहीर केलेल्या तारखेला म्हणजेच २८ मार्च २०२२ ला सुरु होईल. आरबीआयच्या करिअर विभागात देण्यात आलेली तपशीलवार सूचना डाउनलोड करा.