RBI Digital Currency: RBI ने आणला डिजिटल रुपया, देशाचा डिजिटल रुपया लाँच

0

मुंबई,दि.२: RBI Digital Currency: देशाचे पहिले डिजिटल चलन (Digital Currency) भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मंगळवारी सुरू केले. सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (सीबीडीसी) असे या चलनाचे अधिकृत नाव असून पथदर्शक प्रकल्पांतर्गत ते जारी करण्यात आले आहे. (RBI Digital Currency)

डिजिटल चलने ‘सीबीडीसी होलसेल’ आणि ‘सीबीडीसी रिटेल’ अशी २ प्रकारची आहेत. मंगळवारी सुरू झालेले सीबीडीसी हे होलसेल श्रेणीतील आहे. याचा वापर बँका, बिगर बँक वित्तीय कंपन्या आणि अन्य मोठ्या संस्था करतील. त्यानंतर ‘सीबीडीसी रिटेल’ जारी होईल. त्याचा वापर सामान्य लोक करू शकतील. (RBI Digital Currency)

देशातील डिजिटल चलन डिजिटल रुपयाची पहिली प्रायोगिक चाचणी १ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. त्यामध्ये नऊ बँका सरकारी व्यवहारांमध्ये देवाणघेवाणीसाठी या डिजिटल चलनाचा वापर करतील. भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय)ने सांगितले की, डिजिटल रुपयाची पहिली प्रायोगिक चाचणी १ नोव्हेंबर सुरू झाली आहे.

तज्ज्ञांच्या मते सीबीडीसी वित्तीय जगतात सर्वात मोठ्या विकासांपैकी एक आहे. त्याचा संपूर्ण प्रभाव आता निकट भविष्यात दिसून येत आहे. देशभरात यूपीआय आणि क्यूआर आधारित व्यवहारांना वेगाने आत्मसात करण्याचा अनुभव भारताजवळ आहे. सीबीडीसीसोबत ही अपेक्षा आहे की, भारत डिजिटल चलनांचा स्वीकार करण्याच्या दिशेने वेगाने प्रगती करून जगात मोठं पाऊल उचलणार आहे.

दरम्यान, आरबीआयने केंद्रीय बँक डिजिटल मुद्रा (सीबीडीसी) आणण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकताना डिजिटल रुपयाचं पायलट परिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षणामध्ये नऊ बँका सहभागी होणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, यूनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, आसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, यस बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि एचएसबीसी बँक यांचा समावेश आहे.

आरबीआयच्या डिजिटल चलनाच्या व्यवाहारांच्या पूर्ततेमध्ये येणारा खर्च कमी होण्याची शक्यता आहे. त्यासोबत आरबीआयने सांगितले की, डिजिटल रुपयाची पहिली प्रायोगिक चाचणी एक महिन्याच्या आत सुरू करण्याचा मानस आहे. हे परीक्षण विशेष वापरकर्त्या समुहादरम्यान, मोजक्या ठिकाणी केले जाईल. ज्यामध्ये ग्राहक आणि व्यावसायिकांचा समावेश आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here