Ravindra Jadeja: रवींद्र जडेजा ‘मै झुकेगा नही’, विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशनने जडेजाने मन जिंकले

0

दि.25: Ravindra Jadeja: IND VS SL: श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या T20 मध्ये भारताच्या फलंदाजांनी अप्रतिम खेळ दाखवला. विशेषत: इशान किशनने 89 धावांची खेळी केली. याशिवाय श्रेयस अय्यरनेही नाबाद 56 धावांची खेळी केली. यानंतर भारतीय गोलंदाजानेही आश्चर्यकारक कामगिरी करत श्रीलंकेच्या फलंदाजांची कोंडी केली.

त्याचवेळी प्रदीर्घ कालावधीनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या रवींद्र जडेजाने फलंदाजीत काही कमाल दाखवली नाही, पण गोलंदाजीच्या जोरावर किशनने स्टंपिंग करून दिनेश चंडिमलची विकेट मिळवली.

View this post on Instagram

A post shared by Team India (@indiancricketteam)

यानंतर जडेजाने ‘पुष्पा झुकेगा नही’ स्टाईलमध्ये सेलिब्रेशन करून चाहत्यांची मने जिंकली. जडेजाने 10व्या षटकात चंडीमलला यष्टीचीत करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. जडेजाच्या सेलिब्रेशनच्या या स्टाइलने जमलेल्यांची मन जिंकले.

‘मैं झुकेगा नहीं’ हा डायलॉग अलीकडेच रिलीज झालेल्या अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा’ चित्रपटातील आहे, अलीकडच्या काळात या चित्रपटाच्या या डायलॉगने खळबळ माजवली आहे. अशा परिस्थितीत, जडेजाने विकेट घेतल्यानंतर, या कृतीची पुनरावृत्ती केल्याने चाहत्यांना नाचण्यास भाग पाडले, CSKने (सीएसके) त्याच्या ट्विटरवर जडेजाची ‘मैं झकेगा नहीं’ शैली देखील शेअर केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here