सत्ता नसताना देवेंद्र फडणवीस यांचे काय होते हे बघा

0

पुणे,दि.2: Ravindra Dhangekar On Devendra Fadnavis: पुणे लोकसभा काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजपाकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर वसंत मोरे हे वंचितचे उमेदवार आहेत. सत्ता असल्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांना नमस्कार केले जात आहेत. सत्ता नसताना त्यांचे काय होते, हे बघा, अशी टीका रवींद्र धंगेकर यांनी केली. 

आजवर महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. त्यांचे नाव आजही घेतले जाते. त्यांच्या कामाची उजळणी केली जाते. देवेंद्र फडणवीस ज्यादिवशी राजकारण सोडतील, त्यादिवशी नमस्कार करायलाही कुणी जाणार नाही. असे धंगेकर म्हणाले.

देवेंद्र फडणवीस कुणाचाही करेक्ट कार्यक्रम करू शकतात. अजित पवारांना प्रचंड त्रास दिला गेला, म्हणूनच ते एनडीएमध्ये गेले, असा मोठा दावा रवींद्र धंगेकर यांनी केला. विधानसभा तसेच महानगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला किती संधी मिळते, ते आता पाहावे लागले, असा टोलाही रवींद्र धंगेकर यांनी लगावला. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here