मुंबई,दि.1: भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजपाच्या अनेक नेत्यांना अजून उध्दव ठाकरे यांच्याबद्दल आस्था आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा शिवसेना वेगळे झाले. नंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर दावा ठोकला. शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाले.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे 132 उमेदवार विजयी झाले आहेत. महायुतीला 230 जागा मिळाल्या आहेत. भाजपला उद्धव ठाकरे यांची कमी अजूनही वाटत आहे. रावसाहेब दानवे यांनी ही कमी बोलून दाखवली आहे. उद्धव ठाकरे जर भाजप बरोबर असते तर आता मिळालेल्या विजया पेक्षाही प्रचंड विजय मिळवत सत्ता स्थापन केली असती असं वक्तव्य त्यांनी केले आहे.
2019 साली युतीला मोठं बहुमत मिळालं होतं. उद्धव ठाकरे हे आता जरी भाजप बरोबर असते तर आता मिळालेल्या यशा पेक्षा मोठं यश मिळालं असतं. थंम्पिंग मेजॉरटीसहीत सरकार स्थापन केलं असतं असं वक्तव्य दानवे यांनी केलं आहे. पण त्यांच्या वागण्या बोलण्यामुळे त्यांनी स्वत:चं नुकसान करून घेतलं. त्यामुळेच शिवसेना फुटली असंही ते म्हणाले.