Ranveer Raut | माजी आमदाराच्या मुलाचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल 

0
Ranveer Raut | माजी आमदाराच्या मुलाचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल

सोलापूर,दि.२८: Ranveer Raut Video | बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांचा मुलगा रणवीर राऊत (Ranveer Raut) शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. राजेंद्र राऊत हे सध्या भाजपात (BJP) आहेत. रणवीर राऊत यांचा एका तरुणाला अश्लील भाषेत शिवीगाळ करतानाचा आणि धमकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Ranveer Raut Video

रणवीर राऊत यांचा व्हिडीओ व्हायरल | Ranveer Raut Video Viral

माजी आमदार राजेंद्र राऊत यांचा मुलगा व भाजपाचा पदाधिकारी असलेल्या रणवीर राऊत याने भररस्त्यात गाडीला ओव्हरटेक केल्याचा राग मनात धरून विरोधी पक्षाच्या एका कार्यकर्त्याला समर्थकासह शिवीगाळ केली. शिवसेना आमदार दिलीप सोपल व बारबोले यांच्याविषयीही रणवीरने अपशब्द वापरले असल्याचे सांगण्यात येत आहे. 

व्हायरल झालेल्या व्हिडीओत रणवीर राऊत, ‘बार्शीत सुरक्षित राहायचं की नाही, नाहीतर तुमच्या सर्वांची मान मुरगाळून टाकेन, अशी धमकी देताना दिसत आहे. विरोधी पक्षातील कार्यकर्त्याला दमबाजी करताना रणवीर राऊत याने शिवीगाळ केली व विरोधात गेल्यास माना मुरगाळीन, वाकड पाऊल टाकला तर होत्याचे नव्हते करेन, नीट राहायचे या भाषेत दमबाजी केली आहे.

काय म्हणाले रणवीर राऊत?

हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ माजली आहे. पण बहिणीची छेड काढल्याने जाब विचारल्याचे सांगत रणवीर राऊत यांनी सारवासारव केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here