Ram Satpute: भाजपा उमेदवार राम सातपुते यांचा उमेदवारी अर्ज वैध

0

सोलापूर,दि.20: सोलापूर लोकसभा अनुसूचित जाती मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम विठ्ठल सातपुते (Ram Satpute) यांनी भरलेला उमेदवारी अर्ज त्यांचे विरुद्ध आलेले सर्व आक्षेप फेटाळून निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मंजूर केला.

प्रमोद गायकवाड व कनकुरे या दोघांनी उमेदवारी अर्जास जातीचा दाखला खोटा आहे, प्रतिज्ञापत्रात स्थावर व सोन्याचे मूल्य कमी दाखवले, सण 2019 मधील विधानसभेच्या उमेदवारीवेळी दिलेले प्रतिज्ञापत्र व आत्ताच्या प्रतिज्ञापत्रातील विसंगती या मुद्द्यांवर हरकती घेऊन राम सातपुते यांचा उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली होती.

सुनावणीवेळी राम सातपुते यांचेतर्फे युक्तिवाद करताना अॅड. संतोष न्हावकर यांनी उमेदवारी अर्जास नोंदविलेले आक्षेप मोघम स्वरूपाचे असून त्यापृष्ठयर्थ कोणतेही पुरावे दिले गेलेले नाहीत, केवळ शंकेवर कोणताही निर्णय घेता येत नाही, 2019 मधील प्रतिज्ञापत्र खरे कि खोटे हा व आमदारकी रद्द करा असे विषय या न्यायालयात विचारात घेतले जाऊ शकत नाहीत से निदर्शनास आणून दिले व त्यापृष्ठयर्थ मुंबई उच्च न्यायालयाचे निवाडे दाखल केले.

सदरचा युक्तिवाद मान्य करून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्व आक्षेप फेटाळून राम सातपुते यांचा उमेदवारी अर्ज मंजूर केला.

राम सातपुते यांचेतर्फे अॅड. संतोष न्हावकर, अॅड. योगेश कुरे, अॅड. सुदर्शन खाडे यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here