मनसेप्रमुख राज ठाकरे यांना कोरोनाची लागण

0

मुंबई,दि.23: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. राज यांच्यासह त्यांच्या आईनाही कोरोना झाला आहे. बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची पुष्टी केली आहे. राज आणि त्यांच्या आईंना कोरोनाची सुक्ष्म लक्षणं असून ते घरीच उपचार घेत आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री यांना कोविड-19 संसर्गाची लागण झाली आहे. सौम्य ताप आणि लक्षणं दिसून आल्यामुळे कोविड 19 संसर्गाची चाचणी करण्यात आली होती. त्यात राज ठाकरे यांच्या आईंची कोरोना चाचणी शुक्रवारी पॉझिटिव्ह आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या मातोश्री, मोठी बहिण जयवंती ठाकरे-देशपांडे अशा तिघांचे कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.

कालच राज ठाकरे यांना बरं वाटत नसल्यामुळे पुण्याचा दोन दिवसीय दौरा रद्द केला होता. त्यामुळे मनसेचा पुण्यातला मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे. राज ठाकरे यांना ताप आल्याने सर्व कार्यक्रम पुढे ढकलले. 24 ऑक्टोबरला राज ठाकरे पुण्यात तळजाई टेकडीवर जाऊन भेट देणार होते तर शहर कार्यकर्त्यांचा मेळावा ही राज ठाकरे घेणार होते. मात्र राज ठाकरे आजारी असल्याने नियोजित कार्यक्रम रद्द केले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here