Raj Thackeray met Devendra Fadnavis: राज ठाकरे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

0

मुंबई,दि.29: Raj Thackeray met Devendra Fadnavis: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी त्यांचं शासकीय निवासस्थान सागर बंगल्यावर पोहोचले होते. जवळपास तासभर दोघांमध्ये चर्चा सुरु होती. या भेटीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं असून, अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची शक्यता बोलली जात आहे. (Raj Thackeray met Devendra Fadnavis)

शिवसेनेत फूट पडल्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीतील अस्थिर राजकीय वातावरणाचा पक्षाला कसा फायदा होईल यासाठी मनसेकडून प्रयत्न केले जात असल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच आगामी निवडणुकीत भाजपासोबतच्या युतीबाबतची चाचपणी केली जात आहे का आणि यासाठीच आजची भेट गुप्त ठेवण्यात आली होती का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (Raj Thackeray met Devendra Fadnavis)

याआधी जुलै महिन्यात राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाली होती. देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांचं निवासस्थान ‘शिवतीर्थ’वर पोहोचले होते. राज ठाकरेंवर त्यावेळी नुकतीच शस्त्रक्रिया झाली होती.

शस्त्रक्रियेनंतर विश्रांती घेणारे राज ठाकरे पुन्हा एकदा सक्रीय झाले असून नुकतंच ते पुण्यात सभासद नोंदणीसाठी पोहोचले होते. यानंतर राज ठाकरे सोमवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी त्यांच्या शासकीय निवास्थानी पोहोचले होते. या भेटीबाबत दोन्ही नेत्यांनी गुप्तता ठेवली होती. यामुळे या बैठकीबाबत चर्चा सुरु आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here