मुंबई,दि.30: Raj Thackeray America: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमेरिकेत बोलताना न्यायाधिशावर गंभीर आरोप केला आहे. राज ठाकरे यांनी पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणावर धक्कादायक वक्तव्य केले आहे. बिल्डर बाळाला या भीषण अपघाताची शिक्षा म्हणून निबंध लिहिण्यास सांगणे, हे पैशांची देवाणघेवाण झाल्याशिवाय शक्यच नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाच्या अमेरिकेतील अधिवेशनाला राज ठाकरे उपस्थित होते. महाराष्ट्रातल्या पक्षफुटीवरुनही त्यांनी टोले लगावले. अमेरिकेत सॅन होजेला बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाचं अधिवेशन सुरु आहे. या वर्षीच्या अधिवेशनाला राज ठाकरे उपस्थित होते.
तेव्हा त्यांनी पुण्यातील पोर्शे अपघातावर भाष्य केले. अभिनेते आनंद इंगळे आणि ज्येष्ठ पत्रकार अपर्णा वेलणकर यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. मध्ये राज वेगवेगळ्या मुद्द्यांवर व्यक्त झाले.
काय म्हणाले राज ठाकरे? | Raj Thackeray America
राज ठाकरे म्हणाले, पोर्शे अपघातात एका अल्पवयीन मुलाने दोन तरुणांना चिरडले. त्या अल्पवयीन मुलाच्या आईची, बापाची, आजोबाची चर्चा सुरू आहे. मात्र अपघातात मृत दोन तरुणांविषयी कोणीही बोलत नाही. मुलाच्या आई- वडिलांबाद्द बोलत नाही. ती केस कोर्टात गेल्यानंतर तिथला जज त्याला 300 शब्दाचा निबंध लिहायला लावतो. हा कोणता जज आहे. पैशाची देवणघेवाण झाल्याशिवाय अशा प्रकारची गोष्ट कोर्टात होऊ शकत नाही. अशा गोष्टी घडल्यानंतर मग तुम्ही विश्वास कोणावर ठेवणार पोलीसांवर, कोर्टावर, सरकारवर? जनतेचा विश्वास उडाला तर आपण अराजकाकडेच जाणार आहे.