ठाकरे बंधूच्या संयुक्त मुलाखतीचा टीझर प्रसिद्ध

0
ठाकरे बंधूच्या संयुक्त मुलाखतीचा टीझर प्रसिद्ध

सोलापूर,दि.७: शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीचा व्हिडीओ समोर आला आहे. प्रथमच ठाकरे बंधूंनी संयुक्त मुलाखत दिली आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत आणि अभिनेते दिग्दर्शक संजय मांजरेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे. राज्याच्या राजकारणात ‘ठाकरे’ ब्रँड आहे असं म्हटलं जाते. 

पहिल्यांदाच राज आणि उध्दव ठाकरेंची दणदणीत मुलाखत समोर येत आहे. भ्रष्टाचारावर देवेंद्र फडणवीस यांनी बोलूच नये असे राज ठाकरे म्हणतात. तर ‘राज्यकर्त्याचे प्रेम हे राज्यावर असले पाहिजे सत्तेवर असता कामा नये!’ असे उध्दव ठाकरे म्हणाले. ही संयुक्त मुलाखत दैनिक सामनातून उद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here