“उद्या सत्ता परिवर्तन होईल आणि दुसरे येऊन याहून वाईट होईल तेव्हा…” राज ठाकरे

0
मनसे अध्यक्ष राज ठाकरे

मुंबई,दि.४: शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा संयुक्त वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूनी जोरदार टीका केली. धमकी देणाऱ्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निवडणूक आयोगाकडून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. 

हे महाराष्ट्राचे यूपी, बिहार करत आहेत. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ज्या प्रकारचे राजकारण केले जात आहे, त्या प्रकारचे राजकारण महाराष्ट्रात सुरू. महाराष्ट्र वेगळा, सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राचे अशा प्रकारे वाटोळे करणे, महाराष्ट्रातील येणाऱ्या पुढच्या पिढ्यांचे वाटोळे करणे, महाराष्ट्रात जे येऊ इच्छितात राजकारणात त्यांची विचारसरणी बदलणे हे महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी घातक आहे, असे राज ठाकरे म्हणाले. 

त्यांना असे वाटत असेल की आम्ही सत्तेतून कधीच बाजुला होणार नाही, तर त्यांचा हा भ्रम दूर झाला पाहिजे. उद्या सत्ता परिवर्तन होईल आणि दुसरे येऊन याहून वाईट होईल तेव्हा आपण काय करणार आहात याचा विचार सत्ताधाऱ्यांनी त्या-त्या वेळी करणे गजरेचे असते. आपण चुकीचे पायंडे पाडत नाही आहोत ना याचे भान राज्यकर्त्यांकडून सुटले, तर पुढे काय होते हे आज आपण पाहतोय. राज्यातील लोकांनी याचा विचार करणे आवश्यक आहे, असेही राज ठाकरे म्हणाले. 

सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीच आलेले नाही. आज तुम्ही सत्तेत आला तेव्हा काँग्रेसने हे केले ते केला सांगता, पण उद्या तुम्ही जाल आणि तुम्ही जे पायंडे पाडून ठेवलेले आहेत त्याच्या दाम दुपटीने जेव्हा पुढे सुरू होईल तेव्हा कोणाकडे तक्रार करू नका असा सूचक इशारा राज यांनी दिला. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बिनविरोध निवडणुका पश्चिम बंगालमध्ये झाल्या होत्या. त्या विरोधात भाजप सर्वोच्च न्यायालयात गेला होता. आता त्यांचे महाराष्ट्रातील गोष्टींबद्दल काय म्हणणे आहे. आता त्याच पक्षाचे आत्ताच्या महाराष्ट्रातील गोष्टींबाबत काय म्हणणं आहे? हे त्यांनी सांगावे. पश्चिम बंगालमध्ये चालत नाहीत आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही करता असे राज ठाकरे म्हणाले. 

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उमेदवारांना धमकावले आहे. व्हिडीओतून स्पष्ट दिसत आहे. त्यांना सुरक्षा काढून घेण्याचे अधिकार हे विधानसभेत आहेत. बाहेर नाहीत. तरीही ते फोनवरून आदेश देत आहेत. त्यांच्यावर कारवाई केली जावी. पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here