सोलापूर,दि.३०: रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. (Railway Administration Took A Big Decision) यामुळे प्रवाशांना फायदा होणार आहे. रेल्वेने ((Railway) प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांना अडचणी येऊ नयेत यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात असतात. लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आधी आरक्षण तिकीट काढावे लागते.
रेल्वे प्रशासनाने घेतला मोठा निर्णय | Railway Administration Took A Big Decision
प्रवाशांना अधिक सुलभ सेवा देण्यासाठी आणि आरक्षण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे प्रवासाच्या चार नव्हे, तर आठ तास आधी आरक्षण यादी (चार्ट) तयार करण्यात येणार असून, या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाने अधिकृत मंजुरी दिली आहे.

हा निर्णय संपूर्ण देशभरातील लांब पल्ल्याच्या गाड्यांवर तात्काळ लागू करण्यात येणार आहे. रेल्वे बोर्डाच्या या निर्णयामुळे प्रवाशांना वेटिंग लिस्ट, RAC व कन्फर्म तिकीटांची स्थिती वेळेत समजणार असून, शेवटच्या क्षणी निर्माण होणारा संभ्रम कमी होणार आहे. या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.