Rahul Shewale: राहुल शेवाळे यांनी शिवसेना भाजपा युतीबाबत केला गौप्यस्फोट

0

नवी दिल्ली,दि.19: Rahul Shewale: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेचे 12 खासदार शिंदे गटात सामिल झाले आहेत. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल शेवाळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना खासदारांना युतीसाठी ग्रीन सिग्नल दिल्याचा गौप्यस्फोट शिंदे गटाचे गटनेते राहुल शेवाळे यांनी केला आहे. मला पण युती करायची आहे, मी माझ्या परीने खूप प्रयत्न केला. आता तुम्ही तुमच्या पातळीवर प्रयत्न करा असे उद्धव ठाकरे म्हणाल्याचे शेवाळे यांनी सांगितले.

राहुल शेवाळे म्हणाले, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे भाजपसोबत युती करण्यासाठी आग्रही होते. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना खासदारांसोबत मातोश्रीवर बैठक झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, मला पण युती करायची आहे, मी माझ्या परीने खूप प्रयत्न केला. आता तुम्ही तुमच्या पातळीवर योग्य ते निर्णय घ्या.

जून 2021 मध्ये उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींसोबत एक तास चर्चा झाली. मात्र त्यानंतर जुलैच्या अधिवेशनात 12 आमदारांचं निलंबन केलं, त्यातून चुकीचा संदेश गेला, एकीकडे उद्धव युतीचं बोलणं करतायत दुसरीकडे निलंबन करतायत यामुळे भाजप पक्ष श्रेष्ठी नाराज झाले आणि पुढची चर्चा रखडली. आता तुम्ही युतीसाठी प्रयत्न करा असं उद्धव ठाकरेंनी खासदारांना सांगितल्याचे, शेवाळे म्हणाले.

आमदार शिंदेसोबत गेले त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सर्व खासदारांना वर्षावर बोलावलं. तिथे झालेल्या पहिल्या बैठकीत सर्व सेना खासदारांनी आमदारांची भूमिका बरोबर आहे असं सांगत उद्धव ठाकरेंना विनंती केली आपण भाजपसोबत जायला हवं, त्यावेळी उद्धव बोलले की, जर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवणार असतील तर आमदारांची भूमिका मान्य करायची माझी तयारी आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाल्याचे शेवाळे यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here