लातूर,दि.२६: R. T. Deshmukh Accident | भीषण अपघातात भाजपाच्या माजी आमदाराचे निधन झाले आहे. रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे. भाजपा माजी आमदार आर.टी. देशमुख (BJP X MLA R. T. Deshmukh) यांचे अपघातात निधन झाले आहे. लातूर-औसा रोडवर बेलकुंड गावाजवळ कार उलटून भीषण अपघात झाला. यात माजी आमदार आर. टी. देशमुख यांचे निधन झाले. (BJP X MLA R. T. Deshmukh Accident)
आर. टी. देशमुख हे २०१४ ते २०१९ साली माजलगाव मतदारसंघाचे आमदार होते. देशमुख हे आपल्या कारने ( क्र. एमएच ४४ एडी २७९७) तुळजापूरमार्गे लातूरकडे येत होते. देशमुख हे आपल्या कारने ( क्र. एमएच ४४ एडी २७९७) तुळजापूरमार्गे लातूरकडे येत होते. बेलकुंडनजीक असलेल्या उड्डाणपुलावरून काही अंतरावर कार पुढे आल्यावर रस्त्यावर साचलेले पाणी कारच्या काचेवर पडले. त्यामुळे चालकाचा भरधाव कारवरील ताबा सुटला.

BJP X MLA R. T. Deshmukh Accident | भीषण अपघातात भाजपाच्या माजी आमदाराचे निधन
बाजूस असलेल्या रस्त्याच्या कठड्याला कार जोरात धडकली. अपघातात कार चारवेळा पलटी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. यात कारचालक व सोबत असलेले माजी आ. आर. टी. देशमुख गंभीर जखमी झाले होते. दोघांनाही रुग्णवाहिकेतून लातूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, रस्त्यातच माजी आ. आर. टी. देशमुख यांचा मृत्यू झाला. चालकावर उपचार सुरू आहेत. अपघात एवढा भीषण होता की गाडीचा चेंदामेंदा झाला आहे.