PVC Aadhar: UIDAI ने Aadhar Card बाबत घेतला हा महत्वाचा निर्णय

0

दि.१९: UIDAI ने Aadhar Card (आधार कार्ड) बाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. अनेकजण PVC Aadhar पीवीसी आधार बाजारातून प्रिंट काढून घेतात. सरकारी एजन्सीकडून न घेता पीवीसी आधार बाजारातून प्रिंट काढून घेतात. खुल्या बाजारात प्रिंट होणाऱ्या पीवीसी आधार कॉपीच्या वापराला यूआयडीएआयनं विरोध केला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पीवीसी कार्डमध्ये कुठलेही फिचर्स नसतात. त्यामुळे बाजारात प्रिंट केलेले आधार कार्ड कॉपी वापरु नये. पीवीसी आधार कार्ड हवं असल्यास ५० रुपये देऊन सरकारी एजेन्सीकडे ऑर्डर करु शकतात असं सांगण्यात आलं आहे.

यूआयडीएआयनं ट्विटमध्ये सांगितले आहे की, पीवीसी कार्ड अथवा प्लास्टिक आधार कार्ड खुल्या बाजारातून बनवून घेत असाल तर ते मान्य नाही. कुठल्याही आधार कार्डपासून ग्राहक काम करु शकतात. Uidai.gov.in मधून आधार कार्ड डाऊनलोड केले अथवा पीवीसी कार्ड यूआयडीएआयकडून जारी करण्यात आले तर त्याचा वापर आधार कार्डसंबंधित कामासाठी केला जाऊ शकतो.

सुरक्षेचा हवाला देत यूआयडीएआयनं खुल्या बाजारातून प्रिंट केलेल्या आधार कार्डला परवानगी नाकारली आहे. जर ग्राहकांना पीवीसी अथवा प्लास्टिक आधार्ड कार्ड बनवायचं असेल तर त्यासाठी ५० रुपये देऊन यूआयडीएआयच्या पोर्टलवरुन ऑर्डर करु शकतात. काही दिवसांत हे आधार कार्ड बनून तुमच्या पत्त्यावर पाठवलं जाईल.

हेही वाचा Live TV Debate दरम्यान बोलण्याची संधी मिळाली नाही, म्हणून महिला मध्येच उठली आणि लागली नाचू

सध्या बहुतांश लोक आधार कार्ड बनवण्यासाठी अर्ज दिल्यानंतर काही दिवसांत यूआयडीएआयच्या वेबसाईटवर जाऊन डाऊनलोड करतात. ही एक पीडीएफ कॉपी असते. जी फोन किंवा कॅम्प्युटरमध्ये सेव्ह केली जाऊ शकते. परंतु लोकं ही कॉपी घेऊन जात दुकानात लॅमिनेशन करतात किंवा काही पैसे देऊन प्लास्टिक कार्ड बनवलं जातं. मात्र त्या कार्डमध्ये सिक्युरिटी फिचर नसतं. त्यामुळे आधार कार्डच्या सुरक्षेचा मुद्दा उभा राहू शकतो.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here