पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या तारखेला सोलापुरात सभा

0

सोलापूर,दि.21: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापुरात सभा होणार आहे. सोलापूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ मंगळावर 30 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सोलापूर शहरातील भंडारी मैदान येथे होणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.

या सभेचे नियोजन करण्यात येत आहे. शुक्रवार 26 एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेचे नियोजन सोलापूर शहर व जिल्हा भाजपकडून केले जात आहे. सदरची सभा ही पूर्व भागातील पुंजाल अथवा वल्याळ मैदानावर घेण्याबाबत चर्चा सुरू आहे असेही आमदार कल्याणशेट्टी यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here