पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबरला सुरू करणार ही महत्वाची योजना

2

दि.23 : 27 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी एक मोठी योजना सुरू करणार आहेत. यामध्ये प्रत्येक भारतीयाला एक युनिक हेल्थ आयडी (ID) मिळेल. पीएम नरेंद्र मोदी 27 सप्टेंबरला पंतप्रधान डिजिटल आरोग्य मिशन Pradhan Mantri Digital Health Mission)सुरू करणार आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Union Health Minister Mansukh Mandaviya) यांनी ही माहिती दिली आहे. युनिक हेल्थ आयडीमध्ये त्या व्यक्तीचे संपूर्ण आरोग्य रेकॉर्ड असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 सप्टेंबर 2018 मध्ये आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (AB PM-JAY) सुरू केली होती. या योजनेचा आज (23 सप्टेंबर 2021) तिसरा वर्धापनदिन आहे. 23 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी आयुष्मान भारत दिवस (Ayushman Bharat Divas) म्हणून साजरा केला जाणार आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्या आलं. तसंच या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थानही ते भूषवतील, अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली होती.

तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचा समारोप 27 सप्टेंबर 2021 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘प्रधानमंत्री डिजिटल हेल्थ मिशन’ चं लोकार्पण करून होईल.

आयुष्मान भारत (AB PM-JAY) योजनेने तीन वर्षांत केलेल्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी आणि त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी आरोग्य मंथन 3.0 या तीन दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार, नॅशनल हेल्थ अथॉरिटीचे सीईओ डॉ. आर. एस. शर्मा, सदस्य डॉ. विनोद के. पॉल, आरोग्य खात्याचे सचिव राजेश भूषण, एनएचएचे अतिरिक्त सीईओ प्रवीण गेडाम, एनएचएचे डेप्युटी सीईओ डॉ. विपुल अग्रवाल व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असंही या पत्रकात म्हटलं आहे.


2 COMMENTS

  1. यालाच म्हणतात *सबका साथ ,सबका विकास अतिशय आरोग्यावरील चांगली योजना या मुळे लोकाचे आरोग्य सुधारुण .सशक्त भारत उभा राहिल

  2. Heartly congratulations to Adarniy PM Modi ji & Mansukhaji.Like universal card , please start”universal AYUSHYMAN medical ” benefits (5lakhs) to all those citizens who attain 60 years. RAJ NIKAMBE SIR.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here