पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरात केले देशातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचे लोकार्पण

0

सोलापूर,दि.19: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरात देशातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचे लोकार्पण केले. रे नगर कुंभारी येथे 30 हजार घरांचा देशातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. यातील 15 हजार घरांचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी मोदींनी उपस्थित लोकांना संबोधित केले.

यावेळी संबोधित करताना मोदी म्हणाले, पंढरपूरचा श्री विठ्ठल अन्‌ सोलापूरचे ग्रामदैवत सिध्दरामेश्वर महाराजांना नमस्कार. मोदी म्हणाले, ‘देशात दीर्घकाळपर्यंत गरीबी हटाव नारे दिले गेले. परंतु गरीबी गेली नाही. कारण गरीबांच्या नावावर योजना होत होत्या. परंतु त्याचा लाभ योग्य लाभार्थीला मिळत नव्हता. म्हणजे आधी सरकारची नीती, निष्ठा आरोपीच्या पिंजऱ्यात होती. झोपडीऐवजी आता पक्के घरात तुम्हाला राहण्यास मिळणार आहेत.’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरात सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचा उल्लेख करत तुम्ही स्वतःच्या नविन घरात रामज्योती प्रज्वलित करावी असे आवाहन केले. उपस्थित जनसमुदायाने ‘जय श्रीराम जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्या.

मोदींनी सोलापूर चादरीचा उल्लेख करत सोलापूरचे कौतुक केले. सोलापूरचे आणि माझे नाते आहे असे मोदी म्हणाले. ‘सोलापूर शहर हे ही श्रमिकांची नगरी आहे. माझं कार्यक्षेत्र अहमदाबाद आहे. तीही श्रमिकांची नगरी आहे. यंत्रमाग कामगार तेथेही आहेत. पद्मशाली कुटुंबं अहमदाबादमध्येही आहेत. मी अनेकदा त्यांच्याकडे जेवायचो. छोट्या घरात राहायचे; पण जेऊ घालायचे. कधी त्यांना स्वत:ला जेवण मिळाले नाही; पण मला रात्री उपाशी झोपू दिले नाही,’ असेही मोदी म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here