विनयभंग केल्याप्रकरणी दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर

0

सोलापूर,दि.२४: विनयभंग केल्याप्रकरणी दोघांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यात हकिकत अशी की, दि. १४/०६/२०२२ रोजी फिर्यादी महिला ही तिच्या घरी असताना, आरोपी कमलाकर राजकुमार बंदीछोडे तसेच मनगेणी चन्नप्पा बंदीछोडे, रा. बादोला ( ब्रु ), ता. अक्कलकोट व त्यांचे इतर साथीदार यांनी काही कारण नसताना सदर फिर्यादी तसेच तिची मुलगी व वडिल यांना मारहाण केली.

त्यामुळे सदर महिलेने सदर आरोपींविरुध्द अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन दि. १५/०६/२०२२ रोजी फिर्याद दाखल केली. सदर आरोपी कमलाकर राजकुमार बंदीछोडे तसेच मनगेणी चन्नप्पा बंदीछोडे, रा. बादोला ( बु ), ता. अक्कलकोट यांनी अटक होण्याच्या भितीपोटी ॲड. अभिजीत इटकर यांचे मार्फत सत्र न्यायालय, सोलापूर येथे अटकपूर्व जामीनाचा अर्ज दाखल केला.

सदर अटकपूर्व जामीनाच्या युक्तीवादावेळी आरोपींतर्फे असा युक्तीवाद करण्यात आला की, सदर गावा मध्ये दोन राजकीय गट असून, त्या गटांमध्ये सतत वाद चालू असतात. सदर आरोपी हे एका राजकीय गटाचे असून, फिर्यादी पक्ष हा विरुध्द राजकीय गटाचा आहे, फक्त राजकीय व्देषापोटी सदरची फिर्याद दाखल करण्यात आलेली असून, सदर आरोपींकडून काही एक जप्त करावयाचे नसल्यामुळे सदर आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात यावा असा युक्तीवाद करण्यात आला.

सदर आरोपींतर्फे करण्यात आलेला युक्तीवाद ग्राहय धरुन सत्र न्यायाधिश शिरभाते यांनी सदर आरोपींना रु. १५,००० / – च्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला. यात आरोपीतर्फे ॲड. अभिजीत इटकर, ॲड. राजशेखर कोरे , ॲड. दत्ता गुंड, ॲड. सागर पाटील, ॲड. संतोष आवळे, ॲड. फैयाज शेख यांनी काम पाहिले. तर सरकारतर्फे ॲड. दत्तुसिंग पवार यांनी काम पाहिले .


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here